नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता; मूक पदयात्रेतून अभिवादन – आजचा महाराष्ट्र

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता; मूक पदयात्रेतून अभिवादन

प्रतिनिधी महेश स्वामी जंगम

रोहा (कोलाड) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पाळण्यात येणाऱ्या बलिदान मासाची आज,१८ मार्च २०२६ रोजी भावपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली.१८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत संपूर्ण महिनाभर शिवभक्त व धारकरी यांनी विविध धार्मिक उपक्रमांद्वारे महाराजांना अभिवादन केले.या कालावधीत दररोज मंदिर परिसरात एकत्र येत शिववंदना, कीर्तन व श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले. इतिहासातील ४२ दिवसांच्या अमानुष छळाला सामोरे जात धर्मासाठी बलिदान देणाऱ्या संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ हा मास सुतक म्हणून पाळला जातो.सांगता दिनानिमित्त आज सकाळी

शहरात मूक पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. “देव, देश आणि धर्म” या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.पदयात्रा समाप्त झाल्यानंतर प्रतीकात्मक स्वरूपात छत्रपती संभाजी महाराजांना अग्निसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या चितेसमोर उभे राहून देव, देश आणि धर्मासाठी जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली.या संपूर्ण कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय व देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संभाजी महाराजांच्या त्यागाची आठवण करून देत हा बलिदान मास प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]