नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सरकार आणी जनतेतील महत्वाचा दुवा म्हणजे पत्रकार–ना.श्रीपाद नाईक – आजचा महाराष्ट्र

सरकार आणी जनतेतील महत्वाचा दुवा म्हणजे पत्रकार–ना.श्रीपाद नाईक

प्रतिनिधी

पणजी–(डॉ.जयपाल पाटील ब्युरोचीफ यांज कडून) लोकशाहीत चवथा स्तंभ म्हणुन पत्रकाराचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असुन लोकसेवक म्हणुन कार्य करतांना काही वेळेस चुका होतात त्या योग्य वेळी दाखवतात, काम करणारा चुकत असतो ,आपल्या सुचनामुळे राष्ट्रीय सेवा होत आहे,आपल्या फेडरेशन ची महत्वाची मागणी संपुर्ण देशभरात ज्येष्ठ पत्रकारांना समान पेन्शन व्हावी ही मागणी

आपले पंतप्रधानश्री.नरेंद्र मोदी यांचेकडे करेन त्यावेळी माझे सोबत आपले अध्यक्ष श्री.संदीप दीक्षित असतील असे उदघाटन प्रसंगी देशाचे ऊर्जा मंत्री ना. श्रीपाद नाईक यांनी सांगितले. यावेळेस गोवा राज्याचे माहिती संचालक श्री.दिपक बेडेकर म्हणाले पत्रकाराची सेवा अतिशय महत्त्वपूर्ण असुन त्याच्या सुचना,विषेश लेख यासाठी शासन पुरस्कार देऊन कौतुक करते यासाठी नियम आणी वेळेचे नियोजन ठेवावे,आज संमेलनात आलेले ज्येष्ठ पत्रकाराचे अभिनंदन करतो.आपल्या मागण्यांना शुभेच्छा देतो.संमेलनात गोवा जेष्ठ पत्रकार गुरुदास सावल,राजतिलक नाईक, सुभाष नाईक, राष्ट्रीय अध्यक्ष संदीप दीक्षित, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहासिनी प्रभुगावकर,राष्ट्रीय सरचिटणीस एन.पी.चेकुटी यांचे मार्गदर्शन झाले.यावेळेस देशभरातील ७० ज्येष्ठ पत्रकार, स्थानिक पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]