नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल – आजचा महाराष्ट्र

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

प्रतिनिधी

मुंबई :- महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानंतर अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आहेत. यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल होते. जिष्णू देव वर्मा यांनी त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री

म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ते ऊर्जा, ग्रामविकास यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री देखील होते. जिष्णू देव वर्मा त्रिपुरातील राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीला भाजपमधून सुरुवात झाली, त्यांनी त्रिपुरामध्ये डाव्यांचं वर्चस्व असून देखील त्या ठिकाणी भाजपाची मजबूत मोट बांधण्याचं काम केलं.जिष्णू देव वर्मा यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५७ त्यांनी १९९० च्या दशकात भाजपमध्ये प्रवेश केला. त्रिपुरामध्ये डाव्या पक्षाचे वर्चस्व असताना देखील त्यांनी त्याठिकाणी भाजपचा जोरदार प्रचार करून पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम केलं. त्यांनी तीनदा १९९६, १९९८ आणि साली त्रिपुरा इस्ट मतदारसंघातून निवडणूक जिंकली, दरम्यान ते काही काळ त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री देखील होते. तसेच त्यांनी ऊर्जा, ग्रामविकास सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देखील सांभाळली आहे. त्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते तेलंगनाचे राज्यपाल होते. दरम्यान जिष्णू देव वर्मा यांना साहित्य, आणि क्रीडा क्षेत्राची देखील आवड आहे, ते स्वत: एक चांगले लेखक आणि कवी आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]