मनात न्यूनगंड ठेऊ नका,आनंदी रहा-मानसोपचार डाॅ.नंदु गुळमुळे
प्रतिनिधी
रायगड (अलिबाग) :- डॉ.जयपालपाटील ब्युरोचीफ यांज कडून रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय आणी १००० कोटी ठेव असलेली आदर्श पत संस्थेने अलिबाग च्या नागरिक व सभासदांसाठी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नंदु मुलमुळे यांचे जगुया जाणीवपूर्वक या विषयावर व्याख्यान पी.एन.पी.अँड.नाना लिमये नाट्य गृहात आयोजित केले होते.प्रारंभी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.अभिजित पाटील यांनी डाॅ.गुलमुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.आपल्या 
भुतलावर प्राणी जीवनात फक्त आपल्या ७ पिढ्याचा विचार करणारा फक्त माणूस आहे.तो जाणीवपूर्वक जगतो म्हणजे त्याच्या जीवनात ४ टप्प्ये असतात यामधे यश,सुख.आनंद,व समाधान हे आहेत. यात सुख घेऊन येतो.त्यामुळेच आनंद मिळुन जातो आणी आपण समाजासाठी निस्वार्थ पणे कार्य करता तेव्हाच आनंद मिळतो. मनाला आनंद मिळावा या बद्दल जगात प्रथम भुतानचे राजे यांनी त्याचा जनतेसाठी प्रथम आनंद क्लब स्थापन केले मग जगभर झाले.यामधे भारताचा क्रमांक १२७ वा आहे. समाधानासाठी आपला मित्र परिवार असावा लागतो,त्याच बरोबर उत्तम नातेसंबंध असावयास हवे यासाठीच आपल्या घरातील कुटुंबाने एकत्रीत जेवण करावे वेगळा आनंद मिळतो.आपल्या घरातील मुले ही सभोवार पाहुन शिक्षण घेत असतात हे ४०० वर्षापुवीॅ गौतम बुद्धानीं सागिंतले आहे.स्विकार करा जे आहे तसे आणी मनात न्यूनगंड ठेवु नका,प्रथम प्रत्त्येकाचे ऐका मगच जे बोलायचंय आहे ते बोला त्यामुळे माणसे,नातेवाईक नाराज होणार नाहीत. जेष्ठानी मुलांच्या संसारात ढवळाढवळ करु नका,जीवन सुसह्य ठेवा आणी आनंदी रहा व पुढील आयुष्य जाणीवपूर्वक जगा असा मंत्र दिला.यावेळेस संचालक श्री.कैलास जगे, श्री.अनंत म्हात्रे, श्री.सतीश प्रधान, अँड. आत्माराम काटकर, श्री.विलाप सरतांडेल, अँड. डॉ.रेश्मा पाटील, अँड. वर्षा शेठ, श्री.भगवान वेटकोळी, श्री.रामभाऊ गोरीवले, श्री.महेश चव्हाण, श्री.श्रीकांत ओसवाल, श्रीमती सुचित्रा दिवाण,श्री.योगेश विरकुड, श्री.संजय राऊत (सी.ए.)डॉ.मकरंद आठवले,सौ.मीनाक्षी पाटील, कार्यकारी संचालिका, शहरातील जेष्ठ नागरिक, वकील, डॉक्टर, पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.उमेश पाटील यांनी केले तर आभार श्री.अजय थळकर यानी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













