नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्वराज्य सह्याद्रीचा ग्रुप तर्फे किल्ले रायगड ते माणगाव शिवज्योत आगमन शिवप्रेमी उपक्रम १९ फेब्रुवारीला – आजचा महाराष्ट्र

स्वराज्य सह्याद्रीचा ग्रुप तर्फे किल्ले रायगड ते माणगाव शिवज्योत आगमन शिवप्रेमी उपक्रम १९ फेब्रुवारीला

प्रतिनिधी दिलीप करकरे 

रायगड(माणगाव) :- महाराष्ट्राच्या इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांसाठी अभिमानाचा क्षण ठरणारा उपक्रम यंदा नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. स्वराज्य सह्याद्रीचा ग्रुप तर्फे शिवज्योत यांच्या वतीने किल्ले रायगड ते माणगाव हा विशेष शिवप्रेमी उपक्रम १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.छत्रपती शिवरायांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आणि तरुण पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी उत्साहात पार पडतो.

यंदा या उपक्रमाचे हे नववे वर्ष असून शिवभक्त आणि इतिहासप्रेमींचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.कार्यक्रमाची सुरुवात ऐतिहासिक किल्ले रायगड येथून होऊन समारोप माणगाव येथे होणार आहे. या मार्गावर शिवकालीन इतिहासाची माहिती, प्रेरणादायी संदेश आणि सामूहिक सहभागातून शिवज्योत जागवण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.या उपक्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन पवार यांनी सांगितले की, “शिवरायांचा इतिहास जिवंत ठेवणे आणि समाजात स्वराज्याच्या मूल्यांची प्रेरणा देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.”या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रमाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]