नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ३६ वा रस्ता सुरक्षा अभियान : कल्याणमध्ये RSP बालसैनिक संचलन व बँड पथक निवडचाचणीस उत्स्फूर्त प्रतिसाद! – आजचा महाराष्ट्र

३६ वा रस्ता सुरक्षा अभियान : कल्याणमध्ये RSP बालसैनिक संचलन व बँड पथक निवडचाचणीस उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्रतिनिधी

मुंबई (ठाणे – कल्याण) :- दि.२२ ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ३६ व्या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कल्याण येथे आयोजित आर.एस.पी. बालसैनिक संचलन व बँड पथक निवडचाचणीस शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.ठाणे शहर वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार व कल्याण वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त किरण बलवडकर यांच्या नेतृत्वाखाली, गुरुवार दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता, यशवंतराव चव्हाण मैदान (मॅक्सी ग्राउंड), कल्याण पश्चिम येथे ही निवडचाचणी पार पडली.या उपक्रमाचा मुख्य उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे व वाहतूक शिस्तीचे महत्व पटवून देणे हा होता. त्यानुषंगाने ठाणे

वाहतूक विभागाच्या वतीने आर.एस.पी. विद्यार्थ्यांची विभागीय वार्षिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेला कोळसेवाडी वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, कल्याण पश्चिम वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे, अंबरनाथ वाहतूक पोलीस उपनिरीक्षक गवळी, उल्हासनगर वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट, विठ्ठलवाडी वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक पडवळ यांच्यासह अनेक वाहतूक अधिकारी उपस्थित होते.रस्ता सुरक्षा अभियानाचे विभागीय नोडल अधिकारी मनिलाल शिंपी, दिलीप स्वामी, कल्याण जिल्हा समन्वय अधिकारी अनंत किनगे, विनोद शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.या निवडचाचणीत कल्याण, उल्हासनगर व डोंबिवली विभागातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बँड पथक व संचलन पथकाद्वारे विद्यार्थ्यांनी शिस्त, समन्वय आणि उत्साहाचे उत्कृष्ट दर्शन घडविले.स्पर्धेच्या नियोजन व यशस्वी आयोजनासाठी एकूण १६ आर.एस.पी. शिक्षक अधिकारी व बँड मास्टर केतन शिंपी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत वाहतूक नियमांचे पालन हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन रस्ता सुरक्षेसाठी एक भक्कम पाऊल उचलले गेल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]