नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची सदिच्छा भेट! – आजचा महाराष्ट्र

श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची सदिच्छा भेट!

प्रतिनिधी

मुंबई (ठाणे) :- भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र मराडेपाडा येथे असलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ) येथे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री दादाजी भुसे यांनी सदिच्छा भेट देत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून वंदन केले.या प्रसंगी शिवसेना नेते श्री प्रकाश पाटील , शिवसेना नेते श्री रुपेश म्हात्रे , श्री. नितीन जोशी तसेच शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.श्री.राजुभाऊ चौधरी,

विश्वस्त व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.या कार्यक्रमामुळे परिसरात शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.या भेटीदरम्यान मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. मंत्री दादाजी भुसे यांनी शिवरायांच्या आदर्श विचारांचा समाजघडणीसाठी उपयोग व्हावा, अशी भावना व्यक्त केली.उपस्थित मान्यवरांचे शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.श्री. राजभाऊ चौधरी यांनी महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]