उत्कर्ष कॉलेज मधील पुढील शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थिनींना मदतीचा हात पुढे करणार – डॉ. सोन्या पाटील
प्रतिनिधी
उत्कर्ष कॉलेज वासिंद येथे रोजगार व करिअर मार्गदर्शन केंद्र व SAP अभ्यासकेंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न!
मुंबई (ठाणे – वासिंद) :- समाज हितकारिणी संस्था, वासिंद संचलित उत्कर्ष कला, वाणिज्य व विज्ञान (आर.टी.) महाविद्यालय, भातसई–वासिंद येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या रोजगार व करिअर मार्गदर्शन केंद्र, SAP अभ्यासकेंद्र तसेच ऑनलाइन पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी समुपदेशन व प्रवेश केंद्राचे उद्घाटन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या काशिनाथ पाटील, ज्ञान 
विकास संस्था नवी मुंबईचे अध्यक्ष अॅड. पी. सी. पाटील, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, शिवविचार प्रवर्तक शरद फर्डे, रामदास राव पोलीस पाटील सारमल, कवी संतोष रघुनाथ जाधव, युवा अधिकारी भावेश ठाकरे, खातीवली सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन सुखदेव जाधव, सनदी लेखापाल किशोर फलटणकर (शहापूर) यांच्यासह शिक्षकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम समाज हितकारिणी संस्थेचे अध्यक्ष श्री. अरुण विठ्ठल वारघडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उपाध्यक्ष अनिल दिगंबर मानिवडे, सचिव रामदास गणपत शेळके, खजिनदार सौ. वृषाली किसन जाधव, सल्लागार सौ.मानसी मनोहर भोईर,सल्लागार श्रीमती सुषमा अनिल दळवी, अंतर्गत हिशोब तपासणीस विश्वास वसंत परटोले, प्राचार्य डॉ. शेषराव मसुडकर तसेच आरसीएमकेचे डायरेक्टर श्रेयस कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, उद्योगाभिमुख प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. SAP अभ्यासकेंद्रामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योगक्षेत्राशी सुसंगत तांत्रिक ज्ञान मिळणार असून ऑनलाइन अभ्यासक्रमांद्वारे शिक्षणाच्या नव्या संधी खुल्या होणार आहेत.कार्यक्रमात बोलताना डॉ. सोन्या काशिनाथ पाटील यांनी, आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे पुढील शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थिनींना आपण स्वतः मदतीचा हात देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही दिली. या उपक्रमाचा ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.यावेळी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल कुमारी योगिता वसंत वारघडे, कु. अमन कुमार तिवारी व कु. प्रतीक जाधव या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. दिपीका मयूर काबाडी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













