नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रस्त्यावरील अपघात प्रसंगी जखमींना मदत करा,२५ हजाराचे आता बक्षीस मिळेल–प्रा. डॉ. जयपाल पाटील – आजचा महाराष्ट्र

रस्त्यावरील अपघात प्रसंगी जखमींना मदत करा,२५ हजाराचे आता बक्षीस मिळेल–प्रा. डॉ. जयपाल पाटील

प्रतिनिधी

रायगड (पेण) :- महामार्गावर आणि रस्त्यावर दोन चाकी अथवा चारचाकी वाहने अपघातग्रस्तांना ती आपल्याच कुटुंबातील सदस्य समजुन महाराष्ट्र पोलीस ११२ क्रमांक व बीव्हीजी इंडियाची १०८ क्रंमाकाला फोन करुन अपघातग्रस्तांना मदत करा,हे भान नागरिकांनी ठेवले तर त्यास भारत सरकारकडून आता रुपये २५ हजारचे बक्षीस आणी जिल्हाधिकाऱ्यांकडून “मदतवीर” हा किताब मिळेल असे मार्गदर्शन आपत्तीव्यवस्थापन तज्ञ,रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी केले.रायगड जिल्हा परिवहन कार्यालयातर्फे सुरक्षा सप्ताह निमित्त जिते ता.पेण येथे कार्य शाळेचे अध्यक्ष रायगड जिल्हा परिवहन अधिकारी श्री.माधव सुर्यवंशी, डॉ.जयपाल पाटील, श्री.विष्णु घोडे वाहन निरीक्षक, श्री.दीपक ठाकरे,वाहन निरीक्षक, श्री.संतोष मोरे,श्री.मंगेश चौधरी,सहाय्यक निरीक्षक, श्री.एकनाथ सकपाळ, पोलीस उप निरीक्षक आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळेस संयोजक श्री.दीपक ठाकरे यांनी डॉ.जयपाल पाटील यांचा परिचय करून दिला.आणी श्री.माधव सुर्यवंशी यांनी तुळस रोप देऊन डॉ.जयपाल पाटील यांना देऊन सन्मान केला. कार्यशाळेच्या आयोजन बाबत प्रास्ताविक वाहन निरीक्षक श्री.विष्णु घोडे यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ.जयपाल पाटील यांनी संविधान वाचन करून अपघात कधी केव्हा येतील हे सांगता येत नाही यासाठीच केंद्र व राज्य सरकार यांनी केली असून महामार्गावर अपघात झाल्यास प्रथम ११२ पोलीस,आणी १०८ रुग्णवाहिकेस फोन करून मदत करावी आपण नागरिक म्हणून मदत केल्याबद्दल केंद्र सरकार रस्ते मंत्री ना.नितीन गडकरी यांनी नुकतेच जाहीर केल्याप्रमाणे रोख २५ हजार रुपये,बक्षिस व सन्मान प्राप्त होईल यापूर्वीच रुपये ५००० होते.याची शिफारस परिवहन अधिकारी मार्फत होईल,त्याच बरोबर गावाशेजारील जंगलातील आग लागली तर वन खात्याचे १९२६ क्रमांक वर संपर्क करा. आपल्या घरी,मुलगी,सुन यांना बाळंतपणात आपत्ती आल्यास महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून मदत घ्यावी प्राथमिक आरोग्य केंद्र जिते येथील १०२ क्रमांकाची श्री.किरण पाटील पोहचले आपण रेल्वेत प्रवास करताना कोणतीही आपत्ती आल्यास १८२ क्रमांकावर संपर्क साधून मदत घ्यावी, आपल्या कुटुंबास रक्ताताची गरज असल्यास १०४ क्रमांकावर संपर्क साधून मदत घेणे,घर गावात आग लागल्यानंतर १०१ क्रमांकावर संपर्क साधून मदत घेणे. महिला सुरक्षिततेबाबत महाराष्ट्र पोलीस ११२ क्रमांक वापर करावा,तेथे दादर सागरी पोलीस ठाणे येथून पोलीस उपनिरीक्षक श्री.एकनाथ सकपाळ व महिला पोलीस स्वप्नाली पाटील व स्वरा पाटील उपस्थित झाले व ११२ क्रमांकाची माहीती दिली,रायगड जिल्हा १०८ चे प्रमुख श्री.अजय जगताप यांनी डॉक्टर निर्मला डांगे व पायलट श्री.धर्मा झेंडे हे उपस्थित होउन १०८ ची माहीती दिली.यावेळेस महामार्ग पोलीस श्री.म्हात्रे व श्री.पाटील हजर झाले, आग लागली असता पेण नगरपरिषद चे श्री.रमेश देशमुख यांनी आगीचा बंब व आग मदतनीस यांना पाठवून आग विझविण्यात आली.पनवेल येथील सामाजिक कार्यकतेॅ, कंत्राटदार श्री.जे.एम.म्हात्रे कंपनीकडून १०३३ रुग्णवाहीका चालक अनुराग राजपुत,श्री.शशिकांत परिचारक आले.अश्या प्रकारे अधिकारी,कर्मचारी,आणी रायगडातील वाहन चालक, मालक २०० जणांनी कार्य शाळेचा लाभ घेतला.शेवटी अश्या रायगड जिल्ह्यातील प्रत्त्येक तालुक्यात घेण्यात येतील असे परिवहन अधिकारी श्री.माधव सुर्यवंशी यांनी सागितले.कार्य क्रमाने सूत्रसंचालन परिवहन अधिकारी श्री.किरण पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन परिवहन अधिकारी अक्षय खाडे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]