नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संक्रांत दिनी मानवतेचा जागर; अपघातग्रस्त ट्रकचालकाला वाचवण्यासाठी RSP पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचे तत्पर मदतकार्य! – आजचा महाराष्ट्र

संक्रांत दिनी मानवतेचा जागर; अपघातग्रस्त ट्रकचालकाला वाचवण्यासाठी RSP पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचे तत्पर मदतकार्य!

प्रतिनिधी

मुंबई (ठाणे-अहिल्यानगर) :- बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास आरणगाव (जि. अहिल्यानगर) येथील हॉटेल फुडलॅन्डजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गाडीला भरधाव वाहनाची जोरदार धडक बसून गंभीर अपघात झाला. या अपघातात संबंधित ट्रकचालक वाहनात अडकून (पॅक होऊन) गंभीर जखमी झाला होता.घटनेची माहिती मिळताच त्या मार्गाने प्रवास करत असलेले RSP संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष श्री. सिकंदर शेख यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतकार्याला सुरुवात केली. त्यांच्या सोबत इतर वाहनचालक तसेच सहलीवरून परतीचा प्रवास करत असलेले शिक्षकवृंद यांनीही तात्काळ मदतीचा हात पुढे केला.अतिशय संवेदनशील परिस्थितीत

मोठ्या धैर्याने आणि संयमाने जखमी ट्रकचालकाला वाहनातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी रवाना करण्यात आले. सकाळच्या वेळेत व संक्रांतसारख्या महत्त्वाच्या सणाच्या दिवशीही स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता करण्यात आलेले हे मदतकार्य सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.या घटनेबाबत RSP नागपूर संघटनेचे उपाध्यक्ष श्री.पितांबर महाजन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,“मानवी जीवन सेवेपेक्षा मोठे कोणतेही कार्य नाही. संक्रांतसारख्या सणाच्या दिवशी अपघातस्थळी दाखवलेली ही तत्परता, धैर्य व मानवता निश्चितच प्रेरणादायी आहे. विभागीय उपाध्यक्ष श्री. सिकंदर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेले धाडस व सामाजिक भान हे RSP संघटनेच्या मूल्यांचे प्रतीक आहे.”यावेळी RSP नागपूर मुख्यालयाकडून तसेच वैयक्तिक स्तरावर श्री. सिकंदर शेख व मदतकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले. “आपण RSP नागपूर संघटनेचे जबाबदार, जिवलग व महत्त्वपूर्ण घटक आहात, याचा आम्हाला अभिमान आहे. परमेश्वर आपले सदैव रक्षण करो,” असेही यावेळी नमूद करण्यात आले.त्याचबरोबर विभागीय समादेशक तथा रस्ता सुरक्षा समन्वय अधिकारी डॉ.श्री.मनीलाल रतिलाल शिंपी, श्री.दिलीप विष्णू स्वामी व दै.स्वराज्य स्वराज्य तोरणचे संपादक तथा आर एस पी प्रसिद्ध प्रमुख डॉ.श्री.किशाेर बळीराम पाटील यांनीही श्री. सिकंदर शेख यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.या घटनेमुळे समाजात आजही मानवता जिवंत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून अशा सामाजिक जाणिवेतून केलेले कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]