पत्रकार दिनानिमित्त भिवंडीत पत्रकारांचा सन्मान; संपादक डॉ. किशोर पाटील यांना ‘बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ प्रदान
प्रतिनिधी
रायगड :- पत्रकार दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरण व स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कैलासनगर, वळपाडा येथील स्वराज्य तोरण कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे पूजन कृषी उत्पन्न बाजार समिती, भिवंडीचे माजी सचिव तथा चंद्रानंद कृषीपणन व समाजकल्याण संस्था, ठाणे जिल्हा यांचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. यशवंत अनंत म्हात्रे व 
स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक व संपादक डॉ. श्री. किशोर पाटील यांनी केले. विविध भाषिक पत्रकारांनी आपले मतभेद विसरून एकत्र येणे हीच पत्रकारितेची खरी ताकद असून, असा स्नेहमेळावा आयोजित करताना मनाला विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.यावेळी चंद्रानंद कृषीपणन व समाजकल्याण संस्था यांच्या वतीने संपादक डॉ. श्री. किशोर पाटील यांना त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील भरीव योगदानाबद्दल ‘बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह धुळे व नंदुरबारसारख्या आदिवासी दुर्गम भागात जाऊन आदिवासी ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे डॉ. श्री. यशवंत अनंत म्हात्रे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्रीमती संध्याताई पवार, शरद भसाळे, फकरे आलम, संजय भोईर, आचार्य सुरजपाल यादव, मौलाना आसद काझमी तसेच डॉ. श्री. मनिलाल रतिलाल शिंपी (समन्वय अधिकारी – विभागीय समादेशक, आरएसपी) यांनी आपले मनोगत व्यक्त करून आयोजकांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमास समाजसेवक डॉ. श्री. दिनेशभाई ठक्कर (संचालक, स्वामीनारायण हॉल), डॉ. श्री. निखिल चंदेरीया (संचालक, रोटी डे ग्रुप), श्री. धनराजसिंग राठोड (समाजसेवक, मुंबई) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते उपस्थित पत्रकारांना ब्लँकेट व भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करणे व त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील हे वर्षभर पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पत्रकारांना उपयुक्त ठरणाऱ्या भेटवस्तू देऊन ते सातत्याने पत्रकारांचा सन्मान करीत असतात.या कार्यक्रमास भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन आचार्य सुरजपाल यादव व अफसर खान यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













