रोहा तालुक्यातील धाटाव मध्ये प्रदूषण नागरिकाच्या आरोगयाला धोका?
प्रतिनिधी समिर बामुगडे
रोहा :- औधौगिक वसाहतीतून धूक्याचा फायदा घेत हवेत सोडण्यात येणा-या धुरामुळे नागरिकाच्या आरोगयाला धोका निर्माण झाला आहे कित्येकदा याबाबत आवाज उठवूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही खबरदार व कारवाई होत नसल्याने याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे,रोहा येथे जायचं झाल्यास नागरिकांना धाटाव औधौगिक वसाहतीतून जावे लागते हजारो प्रवाशी व नागरिकांना हा प्रवास नाक मुठीत धरूनच करावा 
लागतो या धुरामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे कित्येक नागरिक स्वारस्य टिकवून ठेवणयासाठी मोॅनिग वोॅकला जातात परतू स्वच्छ हवे ऐवजी त्याना धुराचा सामना करावा लागत आहे,आजुबाजूला शेतजमीन असून तेथील शेतक-याचे शेती हेच उपजिवीकेचे एकमेव साधन आहे या धुराचा भातशेती भाजीपाला व इतर पिकांवर विपरीत परिणाम होत असून उत्पन्नात घट येत आहे सदर औधौगिक वसाहातीत स्थानिक पुढा-याचे ठेके चालतात यातूनच स्वत:चे खिसे भरुन ते गब्बर झाले आहेत स्थानिक पुढा-यांकडे तक्रार कराची तर कुंपणच शेत खातय तर तक्रार करायची कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे परतू याच परिस्थीतीचा गैरफायदा कारखानदार मालक घेत आहेत याचा विपरीत परिणाम सामान्य नागरिकाच्या स्वारस्यावर होत असून परिसरात विविध आजार फोफावत असल्याचे दिसून येत आहे,औधौगिक क्षेत्रामुळे आपला विकास होईल अशी अपेक्षा व स्वप्नने येथिल स्थानिकांनी पाहिली परतू येथे 20ते25टक्के स्थानिकांना सामावून घेऊन जास्तीत जास्त भरणा हा परप्रांतीचा आहे म्हणजेच फायदा ऐवजी तोटेच जास्त असल्याने भिक नको पण कुत्र आवर असे म्हणण्याची पाळी स्थानिकांवर आली आहे त्यामुळेच या सर्व विपरीत परिणामाना जबाबदार कोण?कारखानदार मालक प्रदूषण मंडळ, स्थानिक पुढारी, प्रशासन की इतर असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे,
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













