नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शहिद हिराजी पाटील यांना वंदन करण्यास आगरी समाज बांधवांनी उपस्थित रहावे–प्रा.डॉ.जयपाल पाटील – आजचा महाराष्ट्र

शहिद हिराजी पाटील यांना वंदन करण्यास आगरी समाज बांधवांनी उपस्थित रहावे–प्रा.डॉ.जयपाल पाटील

प्रतिनिधी

रायगड (अलिबाग) :–भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून लढणारे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मानिवली या गावचे आगरी समाजातील ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत लढणारे पहिले शहिद हिराजी पाटील यांचा शुक्रवार २ जानेवारी स्मृतिदिना निमित्त त्याच्या कार्याची ओळख आगरी समाजातील तरुण, तरुणी,शालेय विद्यार्थी समाज बांधवांना व्हावी यासाठी रायगडचा युवक फाउंडेशनने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.यांचे शुक्रवार २ जानेवारीला सकाळी

७.३० वाजता आदर्श पतसंस्थेच्या अलिबागेतील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात मान्यवरांकडून बक्षिस वितरण व मार्गदर्शन होणार आहे.यामधे अलिबाग तालुक्यातील इयत्ता ५ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी,११ वी ते१५ वी गट, व खुला यामधे सर्वाना भाग घेण्यास आवाहन केले होते, यात शहिद हिराजी पाटील यांचे जीवन चरित्रावर २ पुर्ण ताव मराठीत पाठवावा.असे प्रसिद्ध केले होते,यामधे गटास प्रथम क्रमांक रु.५०१,द्वितीय क्रमांक रु.३००,तृतीय रु.२०० व प्रमाणपत्र असे बक्षीस आहे. या पहिल्याच स्पधेॅत आर.सी.एफ. माध्यमिक विद्यालय कुरुळ ,जनरल अरुण कुमार वैद्य माध्यमिक विद्यालय,जे.एस.एम.कॉलेज येथून ५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांना मान्यवरांकडून बक्षिस वितरण व मार्गदर्शन होणार असून सहभागी विद्यार्थी-पालकांनी उपस्थित रहावे,अलिबागचे देशप्रेमी नागरिक सहभागी होऊ शकतात.सहभागीनां समारंभात बक्षीस, प्रमाणपत्र, त्वरित देण्यात येणार असून नंतर मिळणार नाही,याची नोंद घ्यावी असे प्रा.डॉ. जयपाल पाटील, यांनी कळविले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]