नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोधिवली येथे सामाजिक सभागृह व सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ – पहिल्यांदाच ४० लाखांचा निधी – आजचा महाराष्ट्र

लोधिवली येथे सामाजिक सभागृह व सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ – पहिल्यांदाच ४० लाखांचा निधी

प्रतिनिधी

रायगड (खालापूरलोधिवली) :- लोधिवली ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला असून गावात सामाजिक सभागृह व सभामंडप उभारणीसाठी ४० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कामांचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत:🔹 २५ लाख रुपये “मुलभूत सुविधा २५१५” योजनेतून सामाजिक सभागृह बांधण्यासाठी🔹 १५ लाख रुपये स्थानिक आमदार निधीतून सभामंडप बांधण्यासाठी प्राप्त झाले आहेत.हा निधी मा. आमदार महेश बालदी साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे (भाजप) यांनी या कामात मोलाची भूमिका बजावली. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.लोधिवली ग्रामपंचायत सदस्य निखिल पाटील, सुशीला भुईकोट, मंगल वाघमारे यांनी या विकासकामांसाठी विशेष पुढाकार घेतला.

या कामांच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित व सहकार्य करणारे ग्रामस्थ रामचंद्र बाबा भुईकोट, काशिनाथ बाबा भुईकोट, प्रभाकर सांगळे, हरी घोलप, शांताराम सांगळे, दिलीप भुईकोट, सुनील पाटील, अनिल पाटील, विनायक भुईकोट, भगवान पार्थे, धर्मा बुवा भोईर, नितीन भुईकोट, प्रदीप सांगळे, संदीप सांगळे राकेश भुईकोट, रुपेश विखारे, साहिल पाटील, संतोष भद्रिके, परशुराम भुईकोट,धनाजी भुईकोट, ,कविता नितीन भुईकोट, मीनल मंगेश भुईकोट, पोलीस पाटील किरण पाटील, पोलिस पाटील योगेश प्रबळकर यांनी उपस्थित राहून व पाठबळ देऊन या कार्याला हातभार लावला.ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, या सुविधांमुळे गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम राबवणे अधिक सुलभ होणार आहे. लोधिवलीच्या विकासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा