नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठी माध्यमातून शिक्षण का ? – आजचा महाराष्ट्र

मराठी माध्यमातून शिक्षण का ?

प्रतिनिधी पांडुरंग माने

मराठी शाळा टिकवणे शिक्षकांच्या हाती.

रायगड (माणगाव) :- मराठी शाळा टिकल्या पाहिजेत” म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा टिकून राहिल्या पाहिजेत. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, यावर अनेकजण सहमत आहेत. मराठी शाळा वाचवण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.मराठी शाळांमधून मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळते, ज्यामुळे त्यांचे शिक्षण अधिक प्रभावी होते.मराठी शाळा वाचवण्यासाठी काय करता येईल? याकडे शिक्षक वर्गानी देखील पुढाकार घेणे गरजेचं आहे दैनिक पुढारी ने आशाच एका शाळेला भेट देऊन सुजाता संतोष मालोरे मुख्याध्यापिका शाळा भादाव शाळेच्या प्रतिक्रिया घेतल्या आज जिल्हा परिषदेच्या पट कमी होत असताना आमच्या रायगड जिल्हा परिषद भादाव शाळेची पटसंख्या मात्र वाढताना दिसत आहे याचे कारण म्हणजे ग्रामस्थ पालकांना मध्ये मराठी माध्यमातून शिकण्याचे फायदे लक्षात आल्याचे दिसून येत आहे आमचे रायगड जिल्हा परिषद शाळा भादाव इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असून गेले पाच वर्षापासून सरासरी पट ३० ते ३५ आहे माझ्या शाळेच्या बाजूलाच पाचशे मीटर अंतरावर डोळे जंग इंग्रजी माध्यमाचे मराठी असून त्या ठिकाणी मात्र माझ्या गावातील एकही विद्यार्थी या ठिकाणी जात नाही मी गेले पाच वर्षांपूर्वी शाळेत शुभ शिक्षकांना हजर झाले गावातील लोकांना मराठी मधून शिकण्याचे फायदे समजून सांगितले. बालमन शास्त्र का असते त्याचे गावातील लोकांना पालकांना मीटिंगमध्ये समजावून सांगितले बाल वयात आपल्या मातृभाषा शिक्षणाची गरज काय याची विविध उदाहरणे देऊन बाल तज्ञांची उदाहरणे देऊन लोकांना पालकांना पटवून दिले याची प्रचिती मला गेली पाच वर्षापासून येत आहे माझ्या शाळेत शाळेतील शिकलेले सर्व विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये मोठे मोठे पदावर काम करत आहेत याचे उदाहरण पालकांना या ठिकाणी समजावून दिले त्यामुळे मला याचा आज खूप आनंद होत आहे रोजगाराच्या जर पालकांना लोकांना संधी उपलब्ध झाल्या तर मात्र मराठी शाळेतला पट टिकून राहण्यास मदत होईल आणि या स्पर्धेचे युगात जर आपल्या मराठी माध्यमाच्या साठी पाहिजे असेल तर मराठी माध्यमातून आपण शिक्षण घेतलं पाहिजे ही काळाची गरज आहे मराठी भाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावतात आणि त्यांना प्रत्येक संकल्पना स्पष्ट समजून घेता येते त्यामुळे पालकांना एक विनंती आहे की आपण आपल्या पाल्याला मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे त्यामुळे या जगामध्ये नवीन उंचीवर आपला विद्यार्थी आपला मुलगा पोहोचू शकेल

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]