नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खामगांव येथील निकृष्ट दर्जाच्या जळजीवन मिशन योजनेच्या कामाच्या विरोधात स्थानिक समाज सेवक ग्रामस्थ ठेकेदाराविरोधात – आजचा महाराष्ट्र

खामगांव येथील निकृष्ट दर्जाच्या जळजीवन मिशन योजनेच्या कामाच्या विरोधात स्थानिक समाज सेवक ग्रामस्थ ठेकेदाराविरोधात

प्रतिनिधि पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :- केंद्र शासनाकडून जळजीवन मिशन योजने अंतर्गत गावोगावी पाणी पुवठा करण्याचे काम जोरात सुरु, समस्त नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने केंद्र शासनामार्फत जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे, म्हसळा तालुक्यातील खामगांव व खामगांव ग्रामपंचायत हद्दीतील एकूण ३३८ कुटुंबासाठी जलजीवन मिशन योजनेतर्गत मंजूर एकूण १ कोटी a६६ लाख निधीचे काम प्रगती पथावर असताना पाणी साठा करण्यासाठी खामगांव गावालगत डोंगरात बांधण्यास सुरु असलेल्या ७४ हजार लिटर क्षमतेच्या टाकीचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहेअशी माहिती मिळताच पाणी साठा करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या टाकीच्या कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली प्रत्यक्षात पाहणी करून तात्काळ स्थानिक समाजसेवक वाघरे बंधूच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग म्हसळा येथे धाव ठोकली व ग्रामीण पाणी पुरवठा उपाभियंता जे. यु. फुलपगारे यांना सदरील बांधण्यात येत असलेल्या टाकीचे काम निकृष्ट दरज्याचे होत असल्याची माहिती देण्यात आली त्यानंतर तात्काळ ग्रामीन पाणी पुरवठा उपाभियंता व इतर अधिकारी संबंधित

स्थळावर पोहचले व पाहणी करून संबंधित कामाबद्दल उपस्थित ग्रामस्थांसह चर्चा करण्यात झाली व सदरील टाकी रद्द करण्यात येईल व ग्रामस्थ्यांच्या मागणीप्रमाणे ग्रामस्थांकडून ग्रामसभेचा ठराव मंजूर करून पाणीपुरवठा विभाग म्हसळा येथे सादर केल्यास, ठरावानुसार ७४ हजार लिटर क्षमतेच्या पाणी साठा टाकी ऐवजी विभाजित ४५ व २९ हजार लिटर क्षमतेच्या २ पाणी साठा टाक्या शासनाकडून बांधण्यात येतील असे उपस्थित पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांमार्फत खंबीर आश्वासन देण्यात आले.जळजीवन मिशन योजनेतर्गन पाणी साठवण करून पुरवठा करण्यात येणाऱ्या टाकी च्या कामा ठिकाणी पोहचून निकृष्ट दरज्याचा काम न होता उत्कृष्ट दरज्याचा काम करण्यात येईल तसेच सदरील पाणी साठा टाकी रद्द होऊन ग्रामसभेच्या ठरावानुसार विभाजित दोन पाणी साठवण टाक्या बांधण्यात यावे या बाबींचा स्थानिक समाजसेवक वाघरे बंधूच्या नेतृत्वात ग्रामस्थांकडून पाठपुरावा घेतल्यामुळे निश्चितच जळजीवन मिशन चा काम टिकावू व उत्कृष्ट दरज्याचा होईल असा दृढ विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला असून खामगांव व ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]