नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वाघाच्या हल्ल्यात सुधाकर कांबळे ठार, पवनी तालुक्यातील सावरला नियतक्षेत्र गुडेगाव येथील घटना – आजचा महाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात सुधाकर कांबळे ठार, पवनी तालुक्यातील सावरला नियतक्षेत्र गुडेगाव येथील घटना

प्रतिनिधि संजीव भांबोरे

भंडारा :- पवनी तालुक्यातील सावरला नियतक्षेत्र गुडेगाव येथील रहिवासी सुधाकर सिताराम कांबळे या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,दिनांक २३.६.२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास भंडारा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पवनी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र

सावरला नियतक्षेत्र गुडेगाव येथील कक्ष क्रमांक २३८ या संरक्षित वनालगत श्री.सुधाकर सीताराम कांबळे,वय अंदाजे ४५ वर्ष, राहणार गुडेगाव तालुका पवनी, जिल्हा भंडारा यांचा पाळीव प्राण्यांची ते चराई करत असताना वन्यप्राणी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. सदरची घटना ही गुडेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक २३८ संरक्षित वनाच्या सीमेपासून अंदाजे २०० मीटर अंतरावरील शेतात घडलेली आहे.या प्रकरणाची माहिती प्राप्त होताच सहायक वनसंरक्षक भंडारा श्री.वाय.बी नागुलवार , वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.एच.डी. बारसागडे हे आपल्या वनक्षेत्रातील क्षेत्रीय वन कर्मचारीसह तसेच पोलीस ठाणे पवनी येथील पोलीस निरीक्षक हे त्यांचे कर्मचाऱ्यांसह व प्राथमिक प्रतिसाद दल येथे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.तसेच सदर घटनेची माहिती प्राप्त होताच उपवनसंरक्षक भंडारा श्री.राहुल गवई, श्री.पी. जे. कोडापे विभागीय वन अधिकारी(दक्षता), साकेत शेंडे, सहाय्यक वनसंरक्षक , श्री. रोशन राठोड सहाय्यक वनसंरक्षक यांनी मृतांच्या नातेवाईकांना ग्रामीण रुग्णालय पवनी येथे भेट घेऊन सांत्वन केले. वन विभागाद्वारे मृताच्या पत्नीस आर्थिक मदत म्हणून शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ देय असलेली रक्कम दहा लक्ष रुपयांचे धनादेश व पंधरा हजार रुपये रोख मदत करण्यात आली.सदर वाघाचा मागवा घेण्याकरिता जलद कृती दल नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांना पाचरण करण्यात आलेले आहे.सदर वन्य प्राण्यावर निगराणी ठेवण्याकरिता परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरा लावण्यात आलेले आहेत. वन विभागातर्फे स्थानिकांना जंगल परिसरामध्ये एकटे फिरण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच पवनी वनक्षेत्रात उद्भवणाऱ्या मानव -वन्यप्राणी संघर्षाचे अनुषंगाने स्थानिक नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आव्हान वनविभाग भंडारा मार्फत करण्यात येत आहे.

*उपवनसंरक्षक भंडारा*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]