नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दलित. शोषित. कामगार. आदिवासी. शेतकरी, बेरोजगार युवकाला समाधानी जीवन जगायचे असेल तर महाराष्ट्रात किसान सरकार स्थापन करा– मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव – आजचा महाराष्ट्र

दलित. शोषित. कामगार. आदिवासी. शेतकरी, बेरोजगार युवकाला समाधानी जीवन जगायचे असेल तर महाराष्ट्रात किसान सरकार स्थापन करा– मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव

प्रतिनिधि संजीव भांबोरे

नागपूर :- या देशातील दलित ,शोषित, कामगार ,आदिवासी ,किसान बेरोजगार यांना सुखी समाधानी जीवन जगायचे असेल तर महाराष्ट्र सोबतच भारत देशात परिवर्तन घडवून आणणे हे आपले प्रथम लक्ष असल्याचे मत तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के

चंद्रशेखर राव यांनी कविवर्य सुरेश भट्ट सभागृह नागपूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज , शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले ,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर ,बसवेश्वर महाराज, राजमाता जिजाऊ , साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे ,यांना प्रथम अभिवादन करण्यात आले .त्यानंतर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रम घेण्यात आला. पुढे ते म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाले .परंतु भाजप किंवा काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हिताच्या कोणत्याही कायमस्वरूपी योजना राबविल्या नाही. त्यामुळे देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले.तेलंगणा राज्यात जेव्हा आमची सरकार आली त्यावेळी तेलंगणा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न, विजेचा प्रश्न ,शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, बेरोजगारांच्या समस्या ,कामगारांच्या समस्या ,घरकुलांच्या समस्या ,धान खरेदी केंद्राची समस्या ,अशा अनेक समस्या राज्यात भेडसावत होत्या .परंतु त्या

समस्येवर मात करून समस्यांचे निराकरण केले . आज तेलंगणा राज्यात शेतकरी सुखी समाधानाचे जीवन जगत आहे. आज शेतकऱ्यांना २४ तास वीज, शेती करता लागणारे पाणी, पिण्याचे शुद्ध पाणी मोफत दिले जाते . दलित बंधू योजनेअंतर्गत दहा लाख रुपये बेरोजगारांना विना परतावा दिल्या जातात .गरोदर स्त्रियांना दवाखान्यापर्यंत जाण्याकरता व तिथून घरापर्यंत आणण्याकरता गाड्यांची सुविधा केलेली आहे व मुलगी जन्माला आले आली असेल तर १३ हजार रुपये व मुलगा जन्माच्या १२हजार रुपये गरोदर मातांना दिले जातात .त्याचप्रमाणे तेरा प्रकारचे साहित्य सुद्धा दिल्या जातात .अपंगांना ३२१२ प्रोत्साहन राशी दिले जाते. त्याचप्रमाणे बे सहारा ज्यांना मुले नाही अशा एकल निराधारांना २२१२ रुपये प्रोत्साहन महिन्याला दिल्या जाते .शेतकऱ्यांना शेती करण्याकरता दरवर्षी दहा हजार रुपये प्रति एकर प्रोत्साहन राशी दिल्या जाते .येथील तलाठी ऑफिस बंद करण्यात येऊन तलाठ्यांचे दुसऱ्या ठिकाणी समायोजन करण्यात आले व ऑनलाईन पद्धतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार जात आहे. व राज्यात कोणत्याही प्रकारची लूट केले जात नाही. भारत राष्ट्र समिती ही एक चळवळ असून ही चळवळ घराघरात पोहोचविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले त्याचबरोबर या चळवळीला बळकटी देण्याकरता सत्ता सुद्धा हस्तगत करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले कारण सत्यशिवाय आपण काही करू शकत नाही त्यामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचे आव्हान त्यांनी केले. यावेळी पूर्व विदर्भ समन्वयक प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर ,शेतकरी संघटनेचे नेते व देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे ,माजी खासदार हरिभाऊ राठोड , शेतकरी नेते माझी आमदार शंकर अण्णा धोंडगे पाटील ,महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माणिक कदम,माजी आमदार चरण वाघमारे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले .यावेळी विदर्भातून अनेक पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. या कार्यकर्ता मेळाव्याला विदर्भातून पाच ते सहा हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती हे विशेष. विदर्भातील भारत राष्ट्र समिती पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन सुद्धा तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते प्लॉट नंबर १४ राधाकृष्ण नगर साई मंदिराजवळ वर्धा रोड नागपूर येथे करण्यात आले. यावेळी माझी आमदार तोडसाम, माजी आमदार दीपक आत्राम व वरिष्ठ पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]