खेडमधील जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक ….

रत्नागिरी (खेड) :- खेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास खेड शहरामध्ये उदभवणाऱ्या पुरामुळे नागरिकांचे ,व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पावसाळा तोंडावर आला असताना अद्याप खेड जगबुडी नदीतील गाळ काढण्यात आलेला नाही . गाळ
काढण्यासंबंधित विविध कारणे प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. तरी त्वरित गाळ काढण्यात यावा असे निवेदन माजी आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहराच्या वतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

तसेच जगबुडी नदीतील गाळ न काढल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहराच्या वतीने देण्यात आला.सदर वेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खेड तालुकाप्रमुख श्री.संदीप कांबळे ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहरप्रमुख श्री दर्शन महाजन,खेड नगरपरिषद माजी नगराध्यक्ष श्री.अरविंद तोडकरी,माजी नगराध्यक्ष श्री नागेश तोडकरी,भरणे विभागप्रमुख श्री.अंकुश कदम,माजी नगरसेवक श्री राजू संसारे,श्री अण्णा चिंडक,आय टी सेल अधिकारी श्री.मधुर चिखले,श्री.संतोष चाळके,जेष्ठ शिवसैनिक श्री.विष्णू कदम,श्री.संजय मोडसिंग,श्री.बाबाराम पवार तसेच पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













