माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली माजी विद्यार्थ्यांचा एक अनोखा उपक्रम

रत्नागिरी (गुहागर) :- गुहागर तालुक्यामध्ये कोळवली पंचक्रोशीमध्ये ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून “माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली विद्यालय” उदयास आले.”माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली” या माध्यमिक विद्यालयाचे आदरणीय संस्थापक एस.डी.पवार साहेब तसेच पंचक्रोशी मधील सर्व सन्माननीय समाजसेवक यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या रोपट्याचं आज “माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली” या रूपात वटवृक्ष निर्माण झाले आहे.सदर संस्थेच्या अधिपत्याखाली अनेक विद्यार्थी शिकून त्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे.तसेच ह्या 
माध्यमिक विद्यालयातून अनेक विद्यार्थी आजही शिकून जात आहे.ह्या माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेऊन आयुष्याच्या नव्या वाटा शोधत आपले विद्यार्थी मित्र मार्गक्रमण करत असतो.या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी काही माजी विद्यार्थ्यांनी मुलांच्या आवडीकडे लक्ष देत “माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली प्रीमियर लीग” या स्पर्धेचे नेत्रदीपक असे आयोजन केले आणि माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा अनोखा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.या पाश्र्वभूमीवर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक- एम. वाय.पाटील सर,एस.एस.कदम सर,बी.के.लवटे सर आणि एस. डी.पवार साहेब यांना ही संस्था अधिक बळकट व्हावी यासाठी नेहमीच सोबतीचा हात देत असलेले शांतारामजी वाघे, , प्रकाश जोशी, शंकर जोशी, नारायण पांडुरंग मोहिते आणि सर्वच माजी विद्यार्थ्यांचा लाडका विकास कदम ( दादा),अनंत ठोंबरे उपस्थितीत होते.ह्या पंचक्रोशी प्रीमियर लीगला नवनवीन संघ मालकांनी मोलाचे योगदान देऊन संघ मालक म्हणुन पुढाकार घेतला आणि पाच गावातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली प्रीमियर लीगच्या माध्यामातून डोळ्यासमोर ठरवलेला संकल्प यशस्वी रित्या पार पडला. या पाश्र्वभूमीवर “सद्गुरु इलेव्हन” या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तसेच “अवनी इलेव्हन” या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.या पुढे असेच “नवनवीन उपक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन एकत्र कार्यक्रम आयोजित करण्यात यावे”, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक एम.वाय.पाटील सर यांनी केले आहे.सर्व खेळाडूंना,विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सर्व गुरूवर्य यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच माजी विद्यार्थी संघटना यांनी एकत्रित येऊन प्रीमियर लीगचे कार्यक्रमाचे आयोजन केले त्या बद्दल सर्व विद्यार्थ्यांकडून आभार व्यक्त केले.त्याचप्रमाणे या पुढे “विद्यार्थ्यांनी संस्थेची आणि विद्यालयाची प्रगती कशी होईल..?” याकडे जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी लक्ष घालावे असे आवाहन सर्व गुरुजनांकडून करण्यात आले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













