अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी संसदीय समिती स्थापन करावी- राजाभाऊ देशमुख जिल्हाध्यक्ष काँग्रेस

जालना जिल्हा काँग्रेस कमिटी कडून जिल्हाभरात आंदोलन
जालना (भोकरदन) :- अदानीच्या गैरकारभाराचा भंडाफोड झाला असुन तब्बल ७ लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा अदानीचा नसून जनतेचा आहे . केंद्र(मोदी) सरकारने अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एल आयसी व झतर सरकारी वित्तीय संस्थांचा पैसा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.हा पैसा सुरक्षित राहावा व गौतम अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणी साठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार जालना जिल्हा काँग्रेस 
कडून जिल्हाभर आंदोलन करनार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी भोकरदन तालुका कमिटी द्वारा आयोजित आंदोलनावेळी म्हणाले .
भोकरदन येथे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी द्वारे शहरातील एसबीआय बँकेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी “या (मोदी)केंद्र सरकारचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय ” व “अदानीच्या गैरकारभाराची चौकशी झालीच पाहिजे ” अशा घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, तालुकाध्यक्ष त्रिंबकराव पाबळे, प्रदेश पदाधिकारी भाऊसाहेब सोळुंके, अनिल (मालक) देशपांडे, युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी,शेख रिझवान, चंद्रकांत पगारे,महेश दसपुते, शालीकराम गावंडे, दादाराव भोंबे,दादाराव देशमुख, शेख सलीम,विष्णु भालेराव,सुखदेव रावळकर, कैलास सुरडकर,आजीज पार्टी, अनिल पगारे, रमेश जाधव, सोपान सपकाळ यांच्या सह काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













