आरोग्य सेविका ( आशा वर्कर) पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करा : माजी नगरसेवक रवींद्र भगत यांची मागणी…
प्रतिनिधि पनवेल
रायगड (पनवेल) :- पनवेल महापालिका क्षेत्रा अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत समाविष्ट करण्यात यावे. त्याच बरोबर आरोग्य सेविकांना २०,००० पर्यंत मानधन देण्यात यावे. अशी मागणी माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी केली आहे. यासंदर्भात रवींद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना रीतसर निवेदन दिले आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आशा सेविकांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात शासनाच्या निर्देशानुसार नागिरकांना आरोग्य सेवा पोहचवण्याचा तसेच आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे कार्य उत्तम रीतीने केले आहे. मागील दोन वर्षापासून सातत्याने ज्या घरोघरी जाऊन आरोग्य सेवा देण्यासाठी चे काम केले आहे. त्यामुळे त्यांना वेतन वाढ भेटायला पाहिजे यासाठी महासभेत वारंवार हि मागणी केली आहे.
कोरोना महामारी च्या कार्यकाळात देखील आशा वर्कर सेविकांनी आपल्या जीवाची कोणतीही परवा न करता घरोघरी जाऊन पेशंटची तपासणी केली. डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत झालेल्या चर्चेत त्याच्या मानधन वाढीवर आपण सकारात्मक विचार करू असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आजतागायत त्यांना कोणत्याही स्वरुपाचे वेतनवाढ करण्यात आले नाही. त्यामुळे आशा वर्कर सेविकांच्या वेतनात वाढ करून पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत समाविष्ट करण्यात यावे. तसेच त्यांना २०,००० हजारापर्यंत मानधन देण्यात यावे, अशी मागणी रवींद्र भगत यांनी केली. आता पनवेल महानगरपालिका याबाबत काय भूमिका घेते याकडे आशा वर्कर यांचे लक्ष लागले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













