आदिवासी वयोवृद्धांना जेलमधून बाहेर काढण्याचा प्रयास संस्थेचा प्रयास सफल…

रायगड (पनवेल) :- प्रयास संस्था ही एक सामाजिक संस्था आहे. कारावासात बंदीस्त असलेल्या आणि कारावास भोगत असलेल्या महिला, युवक आणि त्यांची मुले, विधी संघर्ष मुले यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य प्रयास संस्था करते. माणगाव तालुक्यातील आदिवासी महिला व तिचा पती हे दोघे जुलै २०२२ रोजी पासून हे जावयाच्या खुनाच्या गुन्ह्याच्या संशयावरून जिल्हा अलिबाग कारावास गृहात होते. यांना अलिबाग जिल्हा कारागृह येथून प्रयास संस्थेने प्रती १५०००/- रोख रक्कम भरून जामिनावर मुक्त केले आहे.

रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात आदिवासी वाडीवर गरीब आदिवासी वयोवृद्ध पती ( विकास पवार वय ६०) व पत्नी (शेवंता पवार- वय ५५) भागात रहात होते. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह कुटुंब करत होते. यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. दोन्ही मुलांची लग्न झालेली आहेत. त्यांच्या सुनेचा व जावयाचा मृत्यु झालेला आहे. जावयाचा मृत्यू मध्ये यांचा सहभाग होता. या संशयावरून या वयोवृद्ध आदिवासी पती पत्नीला जुलै २०२२ अटक करण्यात आली होती. कारावासात असताना २० नोव्हेंबर २०२२ रोजी आदिवासी महिला (शेवंता पवार- वय ५५) बाथरूम मध्ये पाय घसरून कोसळली. आणि या महिलेला अर्धगांवायू झटका आला. मेडिकल ग्राउंडवर या महिलेला अलिबाग जिल्हा सिविल हाँसपिटल येथे अँडमिट केले होते. तेथून पुढील उपचारासाठी मध्ये जे जे रुग्णालयात तिला हलविण्यात आले होते. १७ डिसेंबर २०२२ रोजी या महिलेला पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले होते. या महिलेची तब्येत अतिशय नाजूक होती. आणि न्यायालयीन लढाई लढण्यासाठी त्यांच्याकडे पैसे ही नव्हते. यामध्ये प्रयास संस्थेने पुढाकार घेऊन त्यांना मदत केली.
प्रयास सेंटर फॉर क्रिमिनॉलॉजि अँड जस्टीस, स्कूल ऑफ सोशल वर्क, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई चा प्रकल्प आहे. मागील ३२ वर्षांपासून न्यायव्यवस्थेत येणाऱ्या महिला, युवक आणि त्यांची मुले, विधी संघर्ष मुले यांचे पुनर्वसन करीत आहे. मुंबई ठाणे आणि लातूर तसेच गुजरात मधील भरूच या कारागृहात आणि महिला संस्थामध्ये पुनर्वसन या विषयाला अनुसरून काम करीत आहे. आणखी पाच मध्यवर्ती कारागृहात प्रकल्प सुरु आहे. तसेच बालसुधारगृह उमरखाडी व After Care संस्था चेंबूर येथे मुलांसोबत पुनर्वसनाचे काम करीत आहे. न्याय व्यवस्थेच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे व विविध सेवा त्यांना देण्याचे काम संस्था करते.अशा अनेक गरीब गरजू न्यायाच्या अपेक्षेत असणाऱ्या लोकांना प्रयास मदतीचा हात देते त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करते.
जिल्हा अलिबाग व तळोजा कारागृह मध्ये बंद असलेल्या आदिवासी पती पत्नीला पाठपुरावा करून बाहेर काढण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे प्रयास संस्थे चे प्रयास सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी व समाज सेवक श्री प्रवीण पाटील, चंद्रकांत शिंदे, मनोहर फणसेकर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. अल्मोमिन लीगल एड फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून जामीन भरण्याची पूर्तता कारण्यात आहे आली. तसेच तुरुंग अधीक्षक श्री. अशोक कारकर साहेब, वरीष्ठ तुरुंग अधिकारी श्री रणनवरे साहेब, तुरुंग अधिकारी निकम साहेब, महिला तुरुंग अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













