नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अलिबाग -वडखळ रस्त्याच्या खड्डे ऍक्टिव्हिस्ट दिलिप जोग यांच्या प्रयत्नांना यश : जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कामे मार्गी – आजचा महाराष्ट्र

अलिबाग -वडखळ रस्त्याच्या खड्डे ऍक्टिव्हिस्ट दिलिप जोग यांच्या प्रयत्नांना यश : जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कामे मार्गी

पत्रकार बाबुराव गोळे

रायगड (मुरुड जंजिरा) :- गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग वडखळ रस्ता दुरावस्थेमुळे अपघातास कारणीभूत ठरत असून रस्त्यावरील अनेक भयानक खड्डे भरण्यासाठी खड्डे ऍक्टिव्हिस्ट सामाजिक कार्यकर्ते दिलिप जोग यांनी रायगड जिल्हाधिकारी यांजकडे एक निवेदन सादर करण्यात आले होते.सदर निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी रायगड यांनी तात्काळ दखल घेत अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग , अनुज पालकर, समीर पालकर, दिलीप जोग आणि मंदार ठाकुर (खड्डे ॲक्टिव्हिटीज) यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात येऊन सदर बैठकीत प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी अलिबाग एच पी पेट्रोल पंप ते jsw कंपनी पर्यंतचे रोड वरील सर्व खड्डे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेणणी, जे अनधिकृत स्पीड ब्रेकर टाकलेले काढणे (वाडगाव फाटा व तींनविरा) व धरमतर ब्रिज ते पी एन पी जेट्टीकडे जाण्यामार्गा पर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनवण्यास तात्काळ मंजुरी दिली आहे. या संदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या दहा ते बारा दिवसात कामाला सुरुवात होणार आहे.

या रस्त्याचा प्रश्नी जोग यांनी गेली सहा सात वर्षे विविध प्रकारची आंदोलने प्रत्यक्ष खड्ड्यात केली आहेत. JSW गेट तें वडखळ नाका हा रस्ता काँक्रीटचा होण्यामध्ये, तसेच रेल्वेपुलानजिक हाईट बॅरीयर्स लावून घेण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहें.देशाचा ७५ वा.अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनी देखील गेल्या बारा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग वडखळ अलिबाग रस्त्याची भयानक दुरावस्था असून याकडे विशेष लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाचे मिडिया प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते दिलिप जोग यांनी स्वातंत्र्यदिनी एन.एच.ए.आय.च्या पनवेल येथील कार्यालयासमोर व वडखळ अलिबाग रस्त्यावरील खड्ड्यांमधे लाक्षणिक उपोषण केले होते.अलिबाग वडखळ रस्त्याच्या प्रश्नी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने दखल घेऊन, विशेष लक्ष पुरवून नुकत्याच घेण्यात आलेल्या बैठकीत NHAI -मार्गाबाबत अधिकारी खोतकर यांना स्पष्ट कालबद्ध सूचना देण्यात येऊन सदर रस्त्याची कामे मार्गी लागणार असल्याने खड्डे ऍक्टिव्हिस्ट दिलीप जोग, अनुज पालकर , समीर पालकर, मंदार ठाकूर, देवव्रत पाटील, गुरुनाथ पाटील, संदेश टेमकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]