सर्पमित्र संदीप घरत यांनी दिले पाचफुटी नागाला जिवदान

रायगड (मुरुड जंजिरा) :- मुरूड शहरातील नाना खोत यांच्या नारळ सुपारीच्या बागेत जाळ्यात अडकलेल्या पाच फुटी नागाला सर्पमित्र संदीप घरत यांनी आपल्या कौशल्याने पकडून जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून जिवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

मुरूड बाजारपेठेतील कै नाना खोत यांच्या पालोजी मोहल्ल्यातील नारळ सुपारीच्या बागेतील कुंपणाचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या जाळीत भक्ष्याच्या शोधात आलेला पाच फुटी विषारी नाग अडकून पडलेल्या अवस्थेत होता. सकाळी नेहमीप्रमाणे बाळ खोत बागेत कामानिमित्त गेले असता हि बाब त्यांच्या लक्षात आली. त्यावेळी या नागाला न मारता सर्प मित्र संदीप घरत याला बोलावून घेतले. व सर्प मित्र संदीप घरत ने या नागाला आपल्या कौशल्याने पकडून जवळील जंगलात सोडून जिवदान दिले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













