नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नूतन वर्षाचे स्वागत शासनाने घातलेल्या नियमाप्रमाणेच करावे – अनिल पाटील (वपोनि – पनवेल) – आजचा महाराष्ट्र

नूतन वर्षाचे स्वागत शासनाने घातलेल्या नियमाप्रमाणेच करावे – अनिल पाटील (वपोनि – पनवेल)

पत्रकार अभिनव येवले

रायगड (पनवेल) :- गत वर्षाचा निरोप घेताना व नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर साजरा करताना शासनाने घातलेल्या नियमाप्रमाणेच साजरा करावा. असे प्रतिपादन पनवेल चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी केले आहे. कोणीही नियमांना डावलून कृत्य केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

असे ही मत त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे मंथन हॉल याठिकाणी ३१ डिसेंबर दिनाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दितील असणारे फार्म हाऊस/रिसॉर्ट चे मालक यांच्या एकत्रितपणे बैठकीत व्यक्त केले आहे.

मागील दोन वर्षांच्या कोरोना काळात कोणतेही सण, उत्सव दिलखुलास पणे साजरे करता आले नाहीत. त्यामुळे २०२२ मध्ये हे सण व उत्सव लोकांनी मोठ्या आनंदाने साजरे केले. आता याच २०२२ वर्षाला निरोप घेताना व नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व ३१ डिसेंबर मोठ्या जल्लोष्यात साजरे करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली असेल त्यासाठी लोकांनी फार्महाऊस, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, हॉटेल्स बुक केले असतील परंतु या ठिकाणी कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही त्याच अनुषंगाने खबरदारी म्हणुन काही सूचना देण्यासाठी पनवेल पोलिस ठाणे यांच्या वतीने दि. २७/१२ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

३१ डिसेंबर साजरा करताना लोकांचे जीवितास कोणत्याही प्रकारे धोका होणार नाही. याची जबाबदारी आपण घ्यावी., महिला सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. महिलांची छेडछाड होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच सदर कार्यक्रमास कोणी मद्यपान केले असल्यास त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या राहत्या घरी सोडण्याची उपाय योजना करावी. सदर कार्यक्रमास आपले फार्म हाऊस रिसॉर्ट हॉटेल रेस्टॉरंट या ठिकाणी कोणीही ड्रग्स अमली पदार्थाचे सेवन किंवा इतर कोणतेही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही. अथवा ठेवणार नाही तसे आढळल्यास संबंधितावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. या दिवसाचा आनंद लुटण्यासाठी काही लोक आपले कुटुंबासह, नातेवाईक व मित्रपरिवार फार्म हाऊस व फार्म हाऊस वरील पाण्यात पोहण्यास जातात परंतु पाण्यात पडून बुडून कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील आशा सूचना पोलिसांनी फार्महाऊस, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, हॉटेल्स मालकांना दिल्या आहेत. तसेच विनापरवाना दारू विक्री केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सी आर पी सी 149 प्रमाणे नोटीस मालकांना बजावण्यात आली आहे. तसेच अग्निशमन यंत्रणा कार्यरत ठेवावी., किचन मधील सुरक्षितता तपासून घ्यावी गॅस सिलेंडरचा साठा रॉकेल / डिझेलचा साठा याकडे विशेष लक्ष पुरवावे., सर्व विद्युत उपकरणांची तपासणी व चाचणी घेऊन ते व्यवस्थित काम करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित विभागाकडून प्राप्त करून घ्यावे. अशा प्रकारचे उपस्थितांना सुचना देण्यात आल्या आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]