नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुमार देशपांडे मदतीच्या प्रतीक्षेतच, फक्त आश्वासन दिले मदत काही आलीच नाही – आजचा महाराष्ट्र

कुमार देशपांडे मदतीच्या प्रतीक्षेतच, फक्त आश्वासन दिले मदत काही आलीच नाही

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) – गेली ३० वर्ष कुमार दादा मुक्या प्राण्यांची सेवा करत आहेत आपल्या उपचारतून अनेक मुक्या प्राण्यांच्या वेदना त्यांनी कमी केल्या,त्यांना बर केल, संपूर्ण जिल्ह्यात कुमार देशपांडे मुक्या प्राण्यांच्या उपचारार्थ फिरत असतात. उपचारासाठी लागणार औषध खर्च ही खूप आहे. तो कुमार दादा गेली कित्येक वर्ष स्वखर्चाने करतात. कुमार देशपांडे

मुक्या प्राण्यांच्या सेवेमुळे संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष, पुढारी सामाजिक संस्था ,सोसायटी यांनी त्यांना आपल्या कार्यक्रमला बोलवून घेऊन त्यांचा सत्कार केला. मदत करण्याचे आश्वासनही दिले पण मदत काही आजवर आलीच नाही. त्यांना कार्यक्रमाला बोलावल्यावर नारळ, सन्मानचिन्ह सोडल तर मुक्या प्राण्यांच्या उपचारासाठी कधीही एक पैशाची मदत झाली नाही. त्याला अपवाद म्हणजे राष्ट्रवादी पक्षाने केलेला सन्मान आणि रोख रक्कम ५० हजार रुपये दिले तुमच्या प्रसिद्धीसाठी तुमच्या कार्यक्रमाला बोलवून घेऊन कृपया त्या देवमाणासाला दावणीला नका बांधू एवढीच विनंती

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]