रोहा. ता. धनगर आळी येथे श्री खंडेराय देवस्थान चंपाषष्ठी हिरक महोत्सवाचे आयोजन

रायगड (रोहा) – तालुक्यातील धनगर आळी येथे खंडेराया देवस्थान आहे ,या देवस्थानामध्ये गेले अनेक वर्ष चंपाषष्ठी महोत्सव साजरा करण्यात येतो, दिनांक २४ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर पर्यंत चंपाषष्ठी उत्सव साजरा होणार आहे, यावेळी प्रतिदिन पूजाअर्चा, सायंकाळी आरती भजन कीर्तन व अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.यावेळी विश्वस्त मंडळाने अध्यक्ष 
संतोष खटावकर, हेमंत शेवाळे, सचिन कुरकुंडे, मिलिंद रायकर, रवींद्र शेवाळे, राजेश विरकर, संभाजी लालगे, संजय कवितके, राहुल गुंड, मार्तंड भांड, सुनिल भादेकर, समीर गोरे, संतोष भादेकर ,गोविंद कवितके, प्रभाकर पाडसे,मल्हार भांड,दिलीप शेवाळे, चंद्रशेखर गुंड, संजीव कवितके, किशोर पाडसे, शिरीष गुंड, सदानंद भांड यांसह महीला अध्यक्षा तृप्ती पाडसे, उपाध्यक्षा राही शेवाळे, यांसह अनिकेत पाडसे, ब्रिजेश भादेकर, शिवम शेवाळे, ऋषिकेश पिसे, अभिषेक गुंड, यश कुरकुंडे, अमेय भादेकर, अनेक मान्यवरांनी ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत २९ रोजी श्री खंडेराय महाराजांची पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मंदिरातून पालखी निघाल्यावर धनगर आळी, राम मारुती चौक बाजारपेठ मार्गे परत मंदीरात येणार आहे, यावेळी अनेक भाविक दर्शनासाठी उभे असतात.श्री चंपाषष्ठी महोत्सव साजरा करण्यासाठी समाज बांधव नागरिक अथक परिश्रम घेत आहेत
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













