खालापूर, ता. वावोशी पोलीस स्टेशन हद्दीतील तब्बल २० दुकाने आणि कोटक महिंद्रा बँकेचे सेटर फोडले, चोरीची तिसऱ्यांदा घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिनिधी संतोष शेवाळे
रायगड (खालापूर) – तालुक्यातील छत्तिशी विभागातील वावोशी आणि डोणवत परिसरात तब्बल २० दुकाने आणि कोटक बँकेचे 
सेटर फोडून चोरीची घटना घडली आहे. या दोन वर्षांमधील ही तिसरी चोरीची घटना घडली असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ही चोरीची घटना काल दि. २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली असून वावोशी फाट्यावरील ५ किराणा दुकान, १ गिफ्टचे दुकान, साईनाथ 
नावाचे हॉटेल, गोंधळी खानावळ, १ मोबाईल विक्री चे दुकान, बियर शॉपी, सिमेंट चे दुकान, कोटक बँक असे सर्वांचेच सेटर तोडून अर्धवट उघडे केले आहेत आणि १ हिरो होंडा पॅशन बाईक चोरीला 
गेली आहे. तरी सदरील घटनेचा पंचनामा खालापूर पोलीस करीत आहेत. डोणवत परिसरात देखील ८ दुकाने फोडली असून दोन वर्षात ही चोरीची तिसरी घटना घडल्याने वावोशी आणि दहागाव छत्तिशी
विभागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या विभागातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी सदर घडलेल्या चोरीच्या घटनेचा अधिक तपास पिएस आय सावंत देसाई, ASI सुर्वे, API कराड, निलेश सोनवणे,पोलीस नाईक पी एन सावंत आदी करीत आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













