खारघर शिवसेनेचे मनेश पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर खारघर से. १८ मधील उद्यानात साफसफाई !

रायगड (पनवेल) : खारघर सेक्टर १८ उद्यानामधील अवस्था वाईट असल्याची तक्रार अनेक सोसायट्यांकडून होत होती.
पावसाळ्यानंतर येथे जास्त गवत असल्याने वेळेवर साफसफाई होत नाही, या ठिकाणी साप असल्याने मोठी दुर्घटना टळण्यासाठी आणि ड्रेनेज लाइन पूर्ण भरून रस्त्यावर खराब पाणी भरलेले होते. सदर प्रश्नांची दखल घेत शिवसेनेचे विभाग प्रमुख मनेश पाटील यांनी तातडीने पनवेल मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मैदानाची साफसफाई करून घेतली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













