खेड ता. खवटी नं.1 केंद्रीय शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम

रत्नागिरी (खेड) – जि.प.केंद्रीय शाळा खवटी नं.1 शाळेत बँक ऑफ इंडिया शाखा – खवटी यांच्या मार्फत बालदिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक कुणाल 
पिंगळे ,रॉबर्ट गजभिये यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाला बँक ऑफ इंडिया खवटी शाखेचे कर्मचारी ओंकार फुटाणे,अनंत दळवी,अतुल कुमार,आकाश धोत्रे, 
जनसेवक ग्रंथालयाचे ग्रंथपाल राजेंद्र दळवी, खवटी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी पेंडखलकर,उपशिक्षक राजेंद्र क्षिरसागर ,ग्रामस्थ दिपाली दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













