नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चिपळूण पिंपळी बुद्रुक येथे मोटार सायकल स्वारांचा भीषण अपघात – आजचा महाराष्ट्र

चिपळूण पिंपळी बुद्रुक येथे मोटार सायकल स्वारांचा भीषण अपघात

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड)-काल दिनांक ८/०९/२०२२ रोजी ता. चिपळूण पिंपळी बुद्रुक, चिपळूण- कराड रोडवर भीषण अपघात घडला रात्री ०८:१५ वाजता मोटर सायकल वरून जाणाऱ्या दोन इसमांचा अपघात झाला. अपघात ठिकाणी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान चिपळूण येथील रुग्णसेविका- चालक श्री. गणेश लहू जाधव यांना संपर्क होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या दोन्ही रुग्णांना मदत केली. त्यातील एकाला चिपळूण मधील अपराध हॉस्पिटल मध्ये दाखल केलं. व दुसऱ्याला मिठाई हॉस्पिटल येथे दाखल केलं. दोन्ही इसमांवर तात्काळ उपचार करण्यात आले. त्यामुळे सध्या त्यांची परिस्थिती चांगली आहे. अपघातात समयी तत्परतेने मदत करणारे श्री. साहिल संतोष रांगले व श्री. गौरव दत्ताराम रेमजे यांचे उपस्थितांनी खूप खूप कौतुक केले. वेळीच मदत केल्याने अपघातग्रस्तांचा जीव वाचला. चिपळूण – कराड रोडवर अपघातांची संख्या वाढत असल्याने स्थानिकांकडून गतिरोधकची मागणी केली जात आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]