तिर्थक्षेत्र असगणी स्वयंभू महादेव मंदिरा समोरील तलावात गणपती बाप्पांचे विसर्जन ढोल ताशांच्या गजरात झाले

रत्नागिरी (खेड)-कोकणात गणपती उत्सव हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो.मुंबई,पुणे सारख्या शहरातुन सर्व चाकरमानी गावी येतात
प्रत्येक घरात गणपती सण भक्ती भावाने साजरा केला जातो.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तिर्थ क्षेत्र असगणी स्वयंभू महादेव मंदीरा समोर गणपती विसर्जन घाटा वर अतिशय भक्तीमय वातावरणात
बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जनाचा कार्यक्रम पोलीस निरीक्षक भोसले साहेब,कदम साहेब, धाङवे साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला .संपूर्ण असगणी गावच्या पाच
दिवसाच्या बाप्पाची मिरवणूक स्वयंभू महादेव मंदीरा जवळ वाजत-गाजत काढण्यात आली. बाप्पांना निरोप अगदी भक्ती मय वातावरणात देण्यात आला . यावेळेस विसर्जन घाटावरती भक्तांची खुप गर्दी झाली होती .

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













