महाराष्ट्राचे लाडके दैवत, सर्वांच्या हाकेला धावणारे, सर्वांचाच प्रिय असा गणपती बाप्पा याच्या आगमनानिमित्त रांगोळी कलाकार रुपाली भोसले यांनी अगदी सुंदर अशी बाप्पाची रांगोळी साकारली आहे
कोल्हापूर प्रतिनीधी,
कोल्हापूर:-महाराष्ट्रातील लोकप्रिय सण गणेशोत्सव या सणाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. या मागे टिळकांचा हेतू खूप छान होता. आपला समाज स्वातंत्र्य पूर्व काळात विविध जातीभेदामधे विखुरला होता. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी खूप अडथळे निर्माण झाले होते. या विखुरलेल्या समाजाला एकत्र आणून स्वातंत्र्यपूर्व देशाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव या सणाची सुरुवात केली.

या गणेशोत्सवाचे औचित्य साधून रांगोळी कलाकार रुपाली भोसले रा. रेठरे (वारणा) तालुका – शाहूवाडी, जिल्हा- कोल्हापूर यांनी श्री. गणेशाचे मनमोहक रूप आपल्या कलेतून साकारले आहे. रुपाली भोसले यांनी आपली अनोखी कला वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने सादर केली आहे. अशा विविधांगी कला सादर करणाऱ्या कलाकराचे सर्व स्तरातून वेळोवेळी कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. यानिमित्ताने त्यांची अनोखी कला दिवसेंदिवस बहरत राहो अशा शुभेच्छा सर्व स्तरातून दिल्या जात आहेत..
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













