नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सिकेटी कॉलेज पनवेल पत्रकार ग्रुप कडून कवेले शाळेत शालेय साहित्य वाटप – आजचा महाराष्ट्र

सिकेटी कॉलेज पनवेल पत्रकार ग्रुप कडून कवेले शाळेत शालेय साहित्य वाटप

प्रतिनिधी जितिन शेट्टी

आपण समाजाचे देणे लागतो पत्रकार शंकर वायदंडे .

रायगड (पनवेल) –रायगड जि प शाळा कवेले ता.सुधागड या गावातील शाळेत आर्थिकदृष्ट्या मागास,गरीब व आदिवासी वस्तीतील मुले शिक्षण घेत आहेत. या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आणि शाळेला मदतीची गरज असल्याचे मुख्याध्यापक दिपक कासार यांच्याकडून कळाले. त्या भागातील पत्रकार व सी. के. टी.कॉलेज पत्रकार वर्गाचे विदयार्थी निवास सोनावळे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन शाळेची पाहणी केली. शाळा आणि विद्यार्थ्यांना मदतीची गरज असल्याचे कळताच त्यांनी स्वतः पत्रकार ग्रूपच्या माध्यमातून शाळेत शिकत असलेल्या ४५ विद्यार्थ्यांना रविवार दि २१ ऑगस्ट रोजी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या शैक्षणिक साहित्यामध्ये वही, खोडरबर, पेन्सिल बॉक्स, कंपास बॉक्स, पाण्याची बॉटल, टीपिन बॉक्स आणि विद्यार्थांना बसण्यासाठी उत्तम दर्जाच्या चटई इत्यादीचा समावेश होता. तसेच यावेळी अंबरनाथ पोलीस कर्मचारी मिलींदसिंग राजपूत या दाम्पत्यांनी रोख रक्कम देऊन मदत केली

यावेळी सी. के. टी कॉलेज पनवेल पत्रकारिता ग्रुपचे स्वागत मुख्यध्यापकांनी करून उपस्थितांचे आभार मानले .

यावेळी पत्रकारिता ग्रुपचे आणि रायगड सम्राटचे संपादक पत्रकार शंकर वायदंडे यांनी यापुढे सुद्धा शाळेला मदत करण्याचे आणि विविध संस्थाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन पत्रकारिता समुहाच्या वतीने दिले. तसेच सर्व नागरिकांनी या शाळेला मदत करण्याचे आवाहन देखील केले. तसेच पत्रकारिता समुहाच्या पत्रकार आणि डी. ए. व्ही शाळा पनवेल या शाळेच्या शिक्षिका रुपाली राणे यांनी मुलांना प्रार्थना यावेळी शिकवली.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर पत्रकार निलेश भोजने, पत्रकार निवास सोनावळे पत्रकार रुपाली राणे, पत्रकार मोहन ढवळीकर, पत्रकार वंदना मत्रे, पत्रकार निमिषा राजपूत, कल्याण वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी मिलिंदसिंग राजपूत दाम्पत्य, कवेळे शाळेचे मुख्यध्यापक दीपक कासार, सह.शिक्षिका प्रियंका मालुसरे तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]