मुंबईतील गणेशोत्सवासाठी आतापर्यंत महापालिकेतर्फे 1562 गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली
मुंबई प्रतिनिधी,
मुंबई : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे आवाहन करण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असताना सार्वजनिक मंडळांकडून अद्याप मंडप परवानगी प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत २७४८मंडळांनी
परवानगीसाठी अर्ज केले असून यातील १५६२मंडळांना पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. तर विविधकारणाने ३३३ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. मंडळांना २३ ऑगस्टपर्यंत परवानगीसाठी अर्ज करता येणार आहे.मंडळांनी या कालावधीत परवानगीसाठी अर्ज करून आवश्यक परवानगी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष उत्सवावर निर्बंध होते. हे निर्बंध हटवल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. सार्वजनिक मंडळांकडून उत्सवाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मंडळांकडून मंडपासाठी प्रशासनाकडून परवानगी घेतली जाते आहे. मात्र गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना परवानगीसाठी वेळेत अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांना दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी वाहतूक पोलीस, मुंबई अग्निशमन दल,स्थानिक पोलीस ठाण्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र गणेश मंडळांची गैरसोय दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध प्राधिकरणाच्या परवानगी एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू केली आहे.
आतापर्यंतची स्थिती
• आलेले एकूण अर्ज – २७४८
दुबार आलेले अर्ज – ४०८
परवानगी दिलेली संख्या – १६६२
• अर्ज फेटाळले – ३३३
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













