ग्रुप ग्रामपंचायत न्हावे तर्फे रा. जी. प. शाळा न्हावेला इन्सिनरेटर भेट दिले
रायगड रोहा प्रतिनीधी ,
रायगड (रोहा)-भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत न्हावे, रा. जी. प. शाळा न्हावे येथे सरपंच, उपसरपंच, माजी,सरपंच, ग्रा. सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,
पालक,मान्यवर व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत,सौ.राजश्रीताई महादेव शाब्बासकर यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत न्हावे कडुन रा.जि.प. शाळा न्हावे या शाळेला विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त असे इन्सिनरेटर उपकरण भेट देण्यात आले. सदर उपकरणाचा वापर महिलांनी मासिक पाळी वेळी वापरण्यात आलेले पॅड नष्ट करण्यासाठी होतो. जेणेकरून वापरात आलेल्या पॅड इतरत्र पडून
त्यामुळे रोगराई होऊ नये, कोणालाही त्याचा त्रास होऊ नये असा आहे. हे उपकरण शाळेला देऊन ग्रामपंचायतीने इतर गावांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी उपस्थित आदरणीय सरपंच सौ. राजश्रीताई शाब्बासकर ,माजी. उपसरपंच, श्री. गहिनीनाथ कटोरे, ग्रामपंचायत सदस्य,श्री. गोविंद तांडेल श्री,दत्ता तांडेल,
शाळेचे शिक्षक वर्ग तसेच इतर मान्यवर होते. सदर उपकरण शाळेला हवे आहे. अशी मागणी शाळेने केली होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत न्हावे कडून सदर मशीन शाळेला बहाल करण्यात आली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













