नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ( मान्यताप्राप्त ) च्या वतीने ०८ ऑगस्ट रोजी राज्यभर धरणे आंदोलन संपन्न – आजचा महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ( मान्यताप्राप्त ) च्या वतीने ०८ ऑगस्ट रोजी राज्यभर धरणे आंदोलन संपन्न

पत्रकार राजेंद्र दळवी

 आम्हाला शिकवू द्या हो…

रत्नागिरी (खेड) :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा मधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तसेच विद्यार्थी व शिक्षकांच्या न्याय संगत मागण्या शासन स्तरावर प्रदीर्घकाळ प्रलंबित आहेत सदर मागण्या समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी शासन पातळीवर कोणतीच अपेक्षित कार्यवाही होत नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले

शासनाकडून येणारे भाराभर विविध उपक्रम राबवणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, लिंक भरणे, त्याचप्रमाणे विविध प्रकारची माहिती देणे यामुळे अध्ययन अध्यापनाचा बराचसा वेळ वाया जात आहे. *आम्हाला शिकवू द्या हो* अशी शासनाकडे मागणी करण्याची वेळ आली आहे. या भरमसाठ उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे सदर प्रश्न अधिक गंभीर होताना दिसत आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य शाखेने सोमवार दिनांक ८ऑगस्ट २०२२ रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याबाबत निर्णय घेऊन तशी नोटीस शासनाला दिली आहे.

संपूर्ण राज्यभर होणाऱ्या राज्याच्या नियोजनाप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष श्री.प्रकाश काजवे व जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांचे आंदोलन उपविभागीय अधिकारी कार्यालय दापोली येथे , गुहागर संगमेश्वर, चिपळूण या तीन तालुक्यांचे आंदोलन उपविभागीय अधिकारी कार्यालय चिपळूण तर राजापूर, लांजा, रत्नागिरी या तीन तालुक्यांचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य शाखेने शासनाला सादर केलेल्या विविध अडतीस मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याकडे लक्ष वेधून त्याची सोडवणूक करून घेणेसाठी हे आंदोलन संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी करण्यात आले

जिल्हा शाखेच्या नियोजनानुसार मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालय दापोली येथे झालेले आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. दिनेश झोरे, श्री.विनायक वाळंज , जिल्हा सल्लागार श्री.परशुराम पेवेकर, जिल्हा संघटक श्री.संजय गडाळे, श्री. देविदास ठोंबरे, श्री.मंगेश कडवईकर, जिल्हा महिला प्रतिनिधी सौ. मनाली कासारे यांच्या मार्गदर्शनानुसार खेड सचिव श्री.अशोक आकुसकर, मंडणगड तालुका अध्यक्ष श्री.वैभव भोसले सचिव श्री.उमेश सापटे, दापोली तालुकाध्यक्ष श्री.जावेद शेख सचिव श्री.दिनेश चव्हाण यांचेसह तालुका पदाधिकारी व सर्व शिक्षक बंधू, भगिनी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]