खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी येथे PSI चांदणे साहेब यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा या उपक्रमासाठी, वाहतुकीच्या नियमां संबधी मार्गदर्शन केले

रत्नागिरी/खेड:- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज खवटी प्रशालेमध्ये आज, दि ०६/०८/२०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हर घर तिरंगा हा उपक्रम तसेच महामार्ग वाहतुकीचे नियम मार्गदर्शनाकरीता श्री चांदणे साहेब ( PSI महामार्ग 
पथक कशेडी )श्री विजय मोरे ( पोलिस हेड काॅन्स्टेबल कशेडी)श्री चंद्रकांत दळवी ( होमगार्ड खवटी)श्री चेतन पवार ( होमगार्ड खवटी)श्री अमित कदम ( होमगार्ड खेड)इतर मान्यवर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही एस पाटील सर, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मित्र उपस्थित होते सर्व मान्यवरांचे

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही एस पाटील सर व श्री प्रमोद दळवी सर यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तदनंतर श्री चांदणे साहेब यांनी हर घर तिरंगा हा उपक्रम कसा राबवावा तसेच ध्वज कसा फडकवावा, केव्हा फडकवावा तो सुरक्षित कसा राहील याबाबतचे अधिक मार्गदर्शन व वाहतुकीचे नियम , यामध्ये १८ वर्षाखालील विद्यार्थ्यानी मोटर सायकल चालवू नये, लायसन्स नसेल तर दंडात्मक कारवाई, मुलांनी रस्त्याने येताना व जाताना ऊजव्या व डाव्या बाजूने चालावे , झेब्रा क्राॅसिंग तसेच अनेक नियम समजावून सांगितले नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई या संदर्भात अधिक मार्गदर्शन केले .

सदर कार्यक्रमाला आजचा महाराष्ट्र (टॉप टेन) न्यूज चॅनलचे प्रतिनिधि श्री राजेन्द्र दळवी सर उपस्थित होते

श्री विजयराजे चंद्रकांत दळवी सर यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













