नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल मध्ये IAS परीक्षा उत्तीर्ण कु. अक्षय संजय महाडिक यांचा सरकार करण्यात आला – आजचा महाराष्ट्र

खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल मध्ये IAS परीक्षा उत्तीर्ण कु. अक्षय संजय महाडिक यांचा सरकार करण्यात आला

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी/ खेड :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज खवटी प्रशालेमध्ये आज दि   ०५  /०८ /२०२२  रोजी IAS परीक्षा उत्तीर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील, खेड तालुक्यामधील कु अक्षय संजय महाडीक, यांचा सत्कार समारोह व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

 

या काकार्यक्रम प्रसंगी त्यांचे वडिल श्री संजय महाडीक ( कृषी अधिकारीखेड ), आई सौ नेहा महाडीक ( मुख्याध्यापिका, नातुनगर ) बंधु महाडीक उपस्थित होते

 

तसेच संस्था अध्यक्ष श्री भालचंद्र बेलोसे, उपाध्यक्ष श्री दिलीप राणे, सेक्रेटरी श्री चंद्रकांत दळवी, सह सेक्रेटरी सौ माधवी दळवी, संचालक श्री सुरेश शिंदे, मुख्याध्यापक श्री व्ही एस पाटील सर व सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी,विद्यार्थी मित्र उपस्थित होते

 

प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच पूजन, दिपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून भारतीय प्रशासकीय सेवा IAS परीक्षा उत्तीर्ण झालेले कु अक्षय संजय महाडीक यांचं संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री भालचंद्र बेलोसे व सर्व संस्था पदाधिकारी, संचालक यांनी कुटुंबीयांसमवेत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचीत सन्मान केला तदनंतर मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी प्रस्ताविक सादर केले, नंतर IAS कु अक्षय संजय महाडीक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत IAS परीक्षेपर्यंतच्या कठीण प्रवासाचा सफल मार्ग विद्यार्थ्याना समजावून सांगितला जीवनात ध्येय उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी अभ्यास व स्पर्धा परीक्षा देखील महत्वाच्या असून आपण त्यात सहभागी झाले पाहीजे असे मत व्यक्त केले तसेच त्यांच्या आई सौ नेहा महाडीक यांनी देखील आपल्या मुलाच्या अभ्यासाची पध्दत विद्यार्थ्याना समजावून सांगितली यानंतर संस्था अध्यक्ष श्री भालचंद्र बेलोसे साहेब यांनी अक्षय संजय महाडीक यांना शुभेच्छा देऊन अखंड महाराष्ट्राबरोबर आपल्या जिल्हा व तालुक्याच नाव देखील उंचावले तसेच मोठ्या पदावर आपण विराजमान होऊन उत्तरोत्तर प्रगति करावी अशा भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजयराजे दळवी सर यांनी कले, तसेच सर्वांचे मनपुर्वक आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]