नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हिंद मराठा महासंघाच्या वतीने कशेडी येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप – आजचा महाराष्ट्र

हिंद मराठा महासंघाच्या वतीने कशेडी येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप

पत्रकार राजेंद्र दळवी

खेड:-पत्रकार राजेंद्र दळवी हिंद मराठा महासंघ तर्फे जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच खेड तालुक्यातील बहुसंख्य शाळांमध्ये संपन्न झाला. सदर उपक्रमांतर्गत मुंबई महानगरपालिका माजी नगरसेविका तथा, महिला अध्यक्षा हिंद मराठा महासंघ कोकण प्रदेश सौ.ज्योतीताई लक्ष्मणराव भोसले यांच्या योगदानातून व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सदानंदराव भोसले, राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड. श्री.आनंदराव भोसले यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा कशेडी लिटी व कशेडी गावणकर या दोन्ही शाळांमधील इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

यापुढेही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा विविध या माध्यमातून पुरविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या या योगदानाबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. मंगेश चाळके, पदवीधर शिक्षक श्री. शरद भोसले, श्री.विष्णू वाघ यांनी हिंद मराठा महासंघ पदाधिकारी व विशेषतः सौ. ज्योतीताई भोसले यांना धन्यवाद दिले तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा आभार मानले .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]