गुरुवर्य काशिनाथ दिपाजीराव दळवी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

खेड /खवटी :- गावात गुरुवर्य काशिनाथ दिपाजीराव दळवी महाराज यांची तिसरी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली स्वानंद सुखनिवासी सदगुरू काशिनाथ महाराज दळवी यांची पुण्यतिथी क्षेत्र खवटी या ठिकाणी सर्व शिष्यगणाच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व शिष्यगण व भाविक

उपस्थित होते यानिमित्ताने महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा संपन्न करण्यात आली त्यानंतर भजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व शिष्यगणानी महाराजांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला सदर कार्यक्रमाला ह. भ. प. गुरुवर्य प्रसाद महाराज दळवी ह. भ. प. एकनाथ महाराज शिंदे ह.भ.प चंद्रकांत महाराज शिंदे ह.भ.प एकनाथ महाराज जाधव ह.भ.प गणपत सुतार महाराज ह.भ.प बबन दळवी महाराज ह.भ .प श्याम गवळी महाराज ह.भ.प सुरेश भोसले महाराज समाजसेवक ग्रामस्थ व पत्रकार राजेंद्र दळवी उपस्थित होते .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













