नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवसेना पनवेल महानगरप्रमुखपदी एकनाथ म्हात्रे तर विश्वास पेटकर यांची तालुकाप्रमुखपदी नियुक्ती – आजचा महाराष्ट्र

शिवसेना पनवेल महानगरप्रमुखपदी एकनाथ म्हात्रे तर विश्वास पेटकर यांची तालुकाप्रमुखपदी नियुक्ती

प्रतिनिधी पनवेल जितीन शेट्टी

पनवेल :- राज्यात शिंदे सरकारच्या स्थापने नंतर रामदास शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उघड समर्थन दर्शविल्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेयांच्या आदेशानुसार एकनाथ म्हात्रे यांची शिवसेना पनवेल महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भरत पाटील यांची पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय दोन दिवसांपूर्वी विश्वास पेटकर पनवेल तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी पक्षाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून काही ठिकाणी नव्याने नियुक्त्या करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर भरत पाटील यांची उपजिल्हाप्रमुखपदी, एकनाथ म्हात्रे यांची पनवेल महानगरप्रमुखपदी, विश्वास पेटकर यांची पनवेल तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पनवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल,खांदा कॉलनी, खारघर, तळोजा येथील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया करण्यात आल्या आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]