नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कळंबोली महामार्गावर शासनाच्या दुर्लक्षपणामुळे होऊ शकतात मोठे अपघात… – आजचा महाराष्ट्र

कळंबोली महामार्गावर शासनाच्या दुर्लक्षपणामुळे होऊ शकतात मोठे अपघात…

पनवेल :- प्रतिनिधी ,

पनवेल : कळंबोली सर्कल जवळच्या महामार्गावर बालमजुरांमुळे वाहन चालकांना वाहन चालवण्यास होत आहे मोठी अडचण. कळंबोली सर्कल येथे सिग्नलला गाडी थांबताच वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी काही बालमजूर धावपळ करीत असतात. तसेच पावसाळ्यामध्ये गाड्यांच्या काचा पुसण्यासाठी तर काही वेळा भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुलेही फिरत असतात. भर पावसात अल्पवयीन मुले अचानक वाहनांच्या पुढे आल्याने बऱ्याच वेळा छोटे मोठे अपघात घडतात. जर शासनाने याकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही. तर पावसामुळे याचे प्रमाण वाढू शकते. अशी चिंता दररोज तेथून वाहान चालवणाऱ्या काही वाहान चालकांनी आणि ट्रॅफिक पोलिसांनी व्यक्त केली आहे. कळंबोलीतील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांचे कुटुंब कळंबोली पुलाच्या खालीच मागील कित्येक महिन्यांपासून अनधिकृतपणे बस्तान करून राहात आहेत. त्याकडे ही शासन दुर्लक्ष करत आहे. पुढील काळात जर एखादी अनहोनी घटना घडली तर त्याची जबाबदारी शासन घेईल का ? असा प्रश्न लोकांना सतावत आहे.

अशीच अवस्था नवीन पनवेल येथील सिग्नल व पनवेल बस स्थानक परिसरात आहे. ही लोक कोण आहेत? कोठून आले आहेत ? याची माहिती शासनाला आहे की नाही याबद्दल ही शंका आहे. जर भीक मागणाऱ्या या अल्पवयीन मुलांच्या बाबतीत शासनाने गंभीरपणे विचार केला नाही. तर यातूनच काही मुले व्यसनाधीन झाली आणि गुंडगिरी कडे वळली तर याला जबाबदार कोण ? असा ही प्रश्न इथे उपस्थित होतो. त्यामुळे यावर योग्य ती उपाय योजना करून या सर्व प्रकाराला आळा घालावा.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]