नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अनधिकृत बांधकामा विरोधात शासकीय वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बेमुदत आंदोलनाला यश… – आजचा महाराष्ट्र

अनधिकृत बांधकामा विरोधात शासकीय वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बेमुदत आंदोलनाला यश…

पत्रकार  अभिनव येवले

मुंबई : वरळी मध्ये सामाज कल्याण विभागाचे मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह आहे. त्या वसतिगृहातील आवारात तेथील स्थानिक लोकांनी अनेक महिन्यांपूर्वी अनधिकृत बांधकाम केले होते. तसेच अनधिकृतपणे तिथे अनेक महिन्यांपासून गाड्या ही पार्क करण्यात येत होत्या. या विरोधात मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मागील दोन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत शासनाच्या बांधकाम विभागाने स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मदतीने दिनांक ११जुलै २०२२ रोजी अनधिकृत बांधकाम तोडले.

 

अनेक महिन्यांपासून वसतिगृहात असलेल्या अनधिकृत बांधकाम व रहदारीच्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पणे करण्यात येणारी गाड्यांची पार्किंग या मुळे तिथे राहत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थ्यांनी अनेक वेळा स्थानिक प्रशासन व समाज कल्याण विभागाला तक्रारी केल्या होत्या परंतु स्थानिक राजकीय लोकांमुळे दबावामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात येत नव्हती. 

याचाच फायदा घेत तेथील स्थानिक गुंड हे विद्यार्थ्यांना धमकावत होते. शिवीगाळ करत होते. जीवे मारण्याची धमकी देत होते. तरीसुद्धा प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई केली जात नव्हती. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचा आहे. प्रशासन वारंवार तक्रार करून सुद्धा कोणतीही दखल घेत नसल्याने शेवटी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात, अनधिकृत बांधकामा विरोधात व स्थानिक प्रशासनाच्या विरोधात बेमुदत आंदोलनाचे रणशिंग फुंकले. सरते शेवटी संविधानिक पद्धतीने छेडलेल्या आंदोलनापुढे प्रशासनाने उशीरा का होईना कारवाई केली. शेवटी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की कोणतीही लढाई ऐकते शिवाय आणि संघर्षाशिवाय जिंकता येत नाही.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]