नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड तालुक्यातील बोरघर हाय स्कूलच्या एस एस सी.च्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी – आजचा महाराष्ट्र

खेड तालुक्यातील बोरघर हाय स्कूलच्या एस एस सी.च्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

    • रत्नागिरी/खेडप्रतिनिधि :-राजेंद्र दळवी 

बोरघर हायस्कूलच एस.एस.सी.परीक्षेचा १००% निकाल खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित ,चिंचवली मेजर ग.ह.पवार हायस्कूलचा माध्य.शालांत परीक्षेचा निकाल १००%टक्के लागला असून विद्यालयात प्रथम क्रमांक-कु.रुचि महेंद्र शेडगे हिने (९२.६०%) गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला तर कु.सायली महिपत पवार हिने (८९.२०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.आणि कु.कैलास सुरेश शिंदे याने(८९.%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविण्याचा मान मिळवला. प्रशालेत परीक्षेस एकूण ५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते,पैकी ५९ विद्यार्थी पास झाले असून, ३८ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, तर १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि २ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण होऊन सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष व सर्व आजी – माजी पदाधिकारी, संस्था सदस्य , मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थांचा आनंद द्विगुणित केला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]