नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गणेश विसर्जनासाठी आलेल्या भक्तांना राहणाळ तलावावर ५ हजार वडापावचे वाटप! – आजचा महाराष्ट्र

गणेश विसर्जनासाठी आलेल्या भक्तांना राहणाळ तलावावर ५ हजार वडापावचे वाटप!

१५ गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी प्रत्येकी २,५०० रुपयांचा धनादेश…

ठाणे / भिवंडी :- (आ. मा. टॉ. टे. न्यु.) भिवंडी तालुक्यातील राहणाळ येथील तलावावर दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर गणेश विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्त व नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत परोपकार सामाजिक संस्था आणि गोपीनाथ भोईर

सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामपंचायत राहणाळ यांच्या विशेष सहकार्याने मोफत ५ हजार वडापावचे वाटप करण्यात आले.गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक व गणेशभक्त राहणाळ तलावाच्या विसर्जन घाटावर उपस्थित होते. या

वेळी उपस्थित भाविकांना सालाबाद प्रमाणे संस्थांच्या वतीने वडापावचे वाटप करून सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण करण्यात आला. याच उपक्रमांतर्गत परिसरातील १५ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळेची फी भरण्यासाठी प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांचे धनादेश

देऊन शैक्षणिक मदतीचा हात पुढे करण्यात आला.या सामाजिक उपक्रमाचे आयोजन परोपकार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनोज दुढाणी तसेच गोपीनाथ भोईर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ मंडळ राहणाळचे अध्यक्ष तथा भाजपा ठाणे जिल्हा

ग्रामीणचे उपाध्यक्ष डॉ. श्री. राजेंद्र गोपीनाथ भोईर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी त्यांनी कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्व गणेशभक्त, ग्रामस्थ आणि मान्यवरांचे आभार मानले.या कार्यक्रमास सौ. सपना राजेंद्र भोईर (माजी सभापती महिला व बालकल्याण

समिती, जिल्हा परिषद ठाणे) मंगेश उबाळे(सदस्य ग्रामपंचायत राहणाळ)दीपक भोईर(सदस्य ग्रामपंचायत राहणाळ)कैलास नाईक( खजिनदार ग्रामस्थ मंडळ राहणाळ)रमेश तरे, सचिव (ग्रामस्थ मंडळ राहणाळ)अँड.सचिन भोईर, (प्रमुख सल्लागार ग्रामस्थ मंडळ

राहणाळ)तसेच सोमनाथ पाटील, दिलीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.गणेश विसर्जनाच्या निमित्ताने भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करण्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आल्याने या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]