नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वज्रेश्वरी कन्या छात्रालयाच्या नूतन इमारतीचे उत्साहात उद्घाटन! – आजचा महाराष्ट्र

वज्रेश्वरी कन्या छात्रालयाच्या नूतन इमारतीचे उत्साहात उद्घाटन!

प्रतिनिधी

कपूरलाल त्रिभुनदास मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने गोरगरीब मुलींसाठी निवासाची सुविधा उपलब्ध…..

वज्रेश्वरी :- (आ. मा. टॉ. टे. न्यु.) पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित अंबिकाबाई धर्माजी जाधव कन्या छात्रालय, वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील मुलींच्या निवासासाठी श्री. कपूरलाल त्रिभुनदास मेहता चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन

शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पांडुरंग जाधव यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख

पाहुणे म्हणून श्री. हरेश मेहता, श्री. सुरेंद्र मेहता, श्री. रोहित मेहता यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पांडूरंग जाधव, उपाध्यक्ष श्रीमती अरुणा जाधव, सरचिटणीस श्री. जी. आर. पाटील, अँड. श्री.

रोहित विजय जाधव तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे ढोल-ताशा व लेझीमच्या तालावर उत्साहात स्वागत

करण्यात आले. नूतन इमारतीचे उद्घाटन माननीय तरला बेंड व रवींद्रभाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच कोनशिला उद्घाटन श्री. हरेशभाई मेहता, श्री. सुरेंद्रभाई मेहता व उमरोली गावचे सरपंच श्री. प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. इमारतीतील नवीन खोल्यांचेही श्री. कपूरलाल त्रिभुनदास मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस श्री. जी. आर. पाटील यांनी केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय जाधव यांनी गोरगरीब व गरजू मुलींसाठी निवासाची उत्तम सुविधा उपलब्ध करून देणारी नूतन इमारत बांधून दिल्याबद्दल श्री. कपूरलाल त्रिभुनदास मेहता चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सभासदांचे आभार मानले. या इमारतीमुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या गरजू मुलींना निवासी राहून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली असून, त्यांच्या शिक्षणाची दारे अधिक व्यापकपणे खुली झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.‘शिक्षणासाठी सुरक्षित निवासाची सुविधा ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची पायरी’ ठरत असून, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अशा उपक्रमांना बळ मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वासिंदकर व सौ. कल्याणी शेजवळ यांनी केले. संस्थेचे पदाधिकारी, ट्रस्टचे प्रतिनिधी, कर्मचारी, हितचिंतक व नागरिकांच्या उपस्थितीत कन्या छात्रालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आनंद व उत्साहात संपन्न झाला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]