संजीवनी सोसायटीत बालगोपालांचा दहीहंडी उत्साहात साजरा
प्रतिनिधी
रायगड / पनवेल :– (आ. मा. टॉ. टे. न्यू|) सेक्टर ६ येथील संजीवनी सोसायटीमध्ये बालगोपालांचा दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीचे सभासद विश्वास भोईर यांच्या पुढाकारातून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सवात सोसायटीतील बालगोपालांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. बालगोपालांनी एकावर एक थर रचत दहीहंडी फोडण्याचा रोमांचक प्रयत्न केला. यावेळी समृद्धी सचिन गायकवाड हिने दहीहंडी फोडून
उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सोसायटी परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सोसायटीचे सभासद कदम, गिरे, गायकवाड, जेधे यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते. बालगोपालांचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थितांनी त्यांना प्रोत्साहन दिले.उत्सवाच्या माध्यमातून सोसायटीतील नागरिकांमध्ये एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले. बालगोपालांच्या सहभागामुळे दहीहंडी उत्सवाला विशेष रंगत आली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













