नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवी मुंबई ASI पांडुरंग पाटील यांच्या आत्महत्या ? पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे! – आजचा महाराष्ट्र

नवी मुंबई ASI पांडुरंग पाटील यांच्या आत्महत्या ? पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे!

प्रतिनिधी   सतिश पाटील

मुंबई  :- दिनांक : ६ सप्टेंबर  A S I ची आत्महत्या? महापेतील लॉजमध्ये जीवन संपवले; मृत्यूपूर्वी व्हिडीओद्वारे पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी वरिष्ठांचा त्रास होतो असे म्हटले आहे.नवी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआई) पांडुरंग पाटील यांनी महापे येथील साची लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.नवी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) पांडुरंग निंबा पाटील (५६) यांनी महापे येथील साची लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्यांनी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे न्यायाची मागणी केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.पाटील हे विशेष शाखेत कार्यरत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून ते घरी गेले नव्हते. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. शनिवारी त्यांचे कुटुंबीय पाटील बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी वाशी पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पाटील यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना महापे येथील साची लॉजमध्ये त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.दरम्यान, पाटील यांनी आत्महत्येपूर्वी दोन व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका व्हिडीओमध्ये त्यांनी एका माजी पोलीस उपायुक्त, एका सहाय्यक पोलीस आयुक्त आणि हेड क्लार्कच्या नावाचा उल्लेख केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणात पोलीस आयुक्तांकडे न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या मुली आणि जवळच्या व्यक्तींची माफी मागितल्याची माहिती आहे.जनतेचे रक्षकच अशी टोकाची घेत असतील याला जबाबदार कोण?सरकारने यावर गांभीर्य पुर्वक विचार व अंमलबजावणी केली पाहिजे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]